केंद्रीय मंत्र्यासमोरच भाजपच्या दोन बड्या नेत्यांत जुंपली...

केंद्रीय मंत्र्यांसमोरचभाजपचेच दोन नेते एकमेकांना भिडल्याची घटना समोर आली आहे.
Ex Chhattisgarh Ministers Outburst At BJP Meeting
Ex Chhattisgarh Ministers Outburst At BJP Meeting

रायपूर : केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्यासमोर भाजपचेच दोन नेते एकमेकांना भिडल्याची घटना समोर आली आहे. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर माजी मंत्र्याने ''माझ्याशी नीट वागा, नाहीतर तुला ठीक करेन'', अशी धमकी दिली. या वादाचा व्हिडिओ समोर आला आहे. 

केंद्रीय अर्थसंकल्पातील विशेष तरतुदींविषयी पत्रकार परिषद घेण्यासाठी केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी रविवारी छत्तीसगढमध्ये होते. यावेळी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले. यावेळी माजी मुख्यमंत्री रमण सिंग यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. भाजपा प्रदेश कार्यालयात हा कार्यक्रम झाला. 

बैठकीला आलेले माजी मंत्री अजय चंद्राकर यांना बैठक व्यवस्था खटकली होती. त्यानंतर काही वेळातच भाजप प्रदेश महामंत्री भूपेंद्र सवन्नी यांच्यासोबत त्यांचा वाद सुरू झाला. चंद्राकार त्यांच्यावर खूप रागावले होते. या रागाच्या भरातच ते म्हणाले, "जा जाऊन चमचेगिरी करा. माझ्याशी जरा नीट वागत जा, नाहीतर तुला ठीक करेन." हा वाद मोबाईलच्या कॅमेरात कैद झाला आहे. 

दोन्ही नेत्यांमधील वाद लक्षात आल्यानंतर केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी मध्यस्थी केल्याचे समजते. त्यानंतर दोन्ही नेते शांत झाले. पण काही वेळात चंद्राकर हे बैठकीतून निघून गेले. या बैठकीला राज्यातील भाजपचे सर्व नेते उपस्थित होते. दरम्यान, दोन नेत्यांमधील वादाचे नेमके कारण समोर आलेले नाही. पण पक्षांतर्गत गटबाजीतून हा वाद झाल्याचे बोलले जात आहे. 

दरम्यान, छत्तीसगढ मध्ये 2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारत सत्ता मिळविली. भाजपने या निवडणूक जिंकण्यासाठी जोरदार तयारी केली होती. छत्तीसगढ मध्ये भाजपचीच सत्ता येणार असे एक्झिट पोलमध्येही दिसत होते. पण काँग्रेसने अविश्वसनीय विजय मिळविला. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com