'मनरेगा'चे शिल्पकार माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंग यांचे निधन - Ex Cabinet Minister Raghuwansh Prasad Singh Passes Away | Politics Marathi News - Sarkarnama

'मनरेगा'चे शिल्पकार माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंग यांचे निधन

वृत्तसंस्था
रविवार, 13 सप्टेंबर 2020

माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंग यांचे आज नवी दिल्लीच्या आॅल इंडिया इन्स्टिट्युट आॅफ मेडिकल सायन्सेसच्या (एम्स) रुग्णालयात निधन झाले. सिंग गेले आठवडाभर एम्समध्ये कोरोनाचे उपचार घेत होते. मनरेगा योजनेचे शिल्पकार म्हणून रघुवंश प्रसाद सिंग ओळखले जातात

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंग यांचे आज नवी दिल्लीच्या आॅल इंडिया इन्स्टिट्युट आॅफ मेडिकल सायन्सेसच्या (एम्स) रुग्णालयात निधन झाले. सिंग गेले आठवडाभर एम्समध्ये कोरोनाचे उपचार घेत होते. मनरेगा योजनेचे शिल्पकार म्हणून रघुवंश प्रसाद सिंग ओळखले जातात. 

सिंग हे बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचे खंदे समर्थक होते. राष्ट्रीय जनता दलाचे वरिष्ठ नेते असलेल्या सिंग यांनी गेल्याच आठवड्यात पक्षाचा राजीनामा देऊन राजकीय वर्तुळाला धक्का दिला होता. सिंग हे डाॅ. मनमोहनसिंग यांच्या मंत्रीमंडळात केंद्रीय मंत्री होते. वैशाली लोकसभा मतदारसंघातील त्यांचे कट्टर विरोधक रामा सिंग यांची राष्ट्रीय जनता दलाशी जवळीक वाढल्याने रघुवंश प्रसाद सिंग अस्वस्थ होते. त्यातूनच त्यांनी पक्षाच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामाही दिला होता. लालू प्रसाद यांनी त्यांची मनधरणी करण्यासाठी पत्र पाठवले होते. पण सिंग यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही.

दरम्यान, लालू प्रसाद यादव यांनी रघुवंश प्रसाद यांना ट्वीटरद्वारे श्रद्धांजली अर्पण केली आहे.

संबंधित लेख