मोठी बातमी : काँग्रेसचा बडा नेता भाजपच्या वाटेवर...थोड्याच वेळात करणार प्रवेश - Eminent personality from Congress will join BJP today | Politics Marathi News - Sarkarnama

मोठी बातमी : काँग्रेसचा बडा नेता भाजपच्या वाटेवर...थोड्याच वेळात करणार प्रवेश

वृत्तसंस्था
बुधवार, 9 जून 2021

भाजपमधील नेते सक्रीय झाले असून इतर पक्षांतील बड्या नेत्यांना गळाला लावले जात आहे.

नवी दिल्ली : भाजपच्या (Bjp) गोटातून एक महत्वाचा बातमी समोर आली आहे. काँग्रेसमधील एक बडा नेता काही वेळातच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार असल्याने उत्सुकता वाढली आहे. अद्याप या नेत्याचे नाव समोर आलं नसल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. (Eminent personality from Congress will join BJP today)

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूकीत भाजपमध्ये तृणमूल काँग्रेसचे अनेक नेते दाखल झाले. निवडणूक निकालानंतर त्यातील काहींची घरवापसी झाली. या काळात भाजपमधील इनकमिंग बंद होती. पण आता पुन्हा एकदा भाजपमधील नेते सक्रीय झाले असून इतर पक्षांतील बड्या नेत्यांना गळाला लावले जात आहे. दिल्लीतील भाजपच्या कायार्लयात दुपारी एक वाजता पक्षप्रवेश होणार आहे. 

पुढील वर्षी पंजाब, गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंडसह काही राज्यांच्या विधानसभा निवडणूका होणार आहेत. यापार्श्वभूमीवर उत्तरेकडील काँग्रेसमधील नेता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. हा नेता एका राज्याचा माजी मंत्रीही असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळं सध्या काँग्रेसची सत्ता नसलेल्या राज्यांतील हा नेता असू शकतो. त्यामध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह उत्तराखंड आदी राज्यांमधील हा नेता असेल, असे सांगितले जात आहे.

सचिन पायलटही नाराज

राजस्थान काँग्रेसमध्येही सध्या राजकीय अस्थिरता आहे. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट नाराज असून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू आहे. हा वाद पक्षश्रेष्ठींपर्यंतही गेला होता. त्यावर तात्पुरता पडदा पडला असला तरी असूनही दोन गट कायम आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख