धक्कादायक : देशात पहिल्यांदाच घडलं असं...आठ सिंह कोरोना पॅाझिटिव्ह

देशातील कोरोनाचाकहर वाढतच चालला असून आता त्याचा प्राण्यांनाही विळखा पडू लागला आहे.
Eight lions from nehru zoological park test positive for corona virus
Eight lions from nehru zoological park test positive for corona virus

हैद्राबाद : देशातील कोरोनाचा (Covid19) कहर वाढतच चालला असून आता त्याचा प्राण्यांनाही विळखा पडू लागला आहे. यापूर्वी काही देशांमध्ये प्राण्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. पण भारतात आतापर्यंत अशा घटना घडली नव्हती. पण आता कोरोना विषाणूने (Corona Virus) प्राण्यांनाही संसर्ग करण्यास सुरूवात केली आहे. 

हैद्राबादमधील (Hyderabad) नेहरू झुलॅाजीकल पार्क (Nehru Zoological Park) मधील आठ सिंहांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॅाझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. हे पार्क तब्बल 380 एकर परिसरात पसरले असून जवळपास दोन हजाराहून अधिक प्राणी आहेत. देशात सर्वाधिक पर्यटक भेट देत असलेल्या पार्कपैकी हे एक पार्क आहे. 

पार्कमध्ये काही सिंहांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्यानंतर त्यांचे नमुने दि सेंटर फॅार सेल्युलर अॅन्ड मॅालेक्युलर बायोलॅाजीकडे पाठविले होते. आठ सिंहांची RT-PCR चाचणी पॅाझिटिव्ह आली आहे. पण पार्कचे संचालक डॅा. सिध्दानंद कुर्केत्य यांनी याला दुजोरा दिलेला नाही. अद्याप तपासणी अहवाल आला नसल्याने त्याबाबत सांगता येणार नाही. पण सिंहांची प्रकृती चांगली आहे, असे त्यांनी सांगितले. 

काही दिवसांपूर्वीच पार्कमध्ये काम करणारे 25 कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यामुळे हे पार्क दोन दिवसांसाठी पर्यटनासाठी बंद करण्यात आले आहे. आता आठ सिंहांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने प्राण्यांमधील धोकाही वाढल्याचे बोलले जात आहे. सिंहांना झालेला कोरोनाचा संसर्ग प्राण्यांपासून की लोकांमधून झाला, याचा शोध घेतला जाणार आहे. त्यासाठी सिंहांच्या नमुन्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग करून विषाणुचा प्रकार शोधला जाणार आहे. 

कोरोनाबाधितांची संख्या दोन कोटींच्या पुढे

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा सोमवारी दोन कोटींच्या पुढे गेला आहे. तसेच दररोज सुमारे साडे तीन हजार जणांचा मृत्यू होत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी काही राज्यांमध्ये कडक लॅाकडाऊन जाहीर कऱण्यात आला आहे. तर महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील स्थिती काही प्रमाणात सुधारत आहे. नवीन कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण कमी होत चालले आहे. 

Edited By Rajanand More
 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com