ईडीने मागवली विकास दुबेच्या संपत्तीची माहिती...

ईडीने कानपूरचे पोलिस आयुक्त मोहित अग्रवाल यांना पत्र लिहिले आहे. विकास दुबे याचे लखनैा, कानपूर परिसरात अनेक ठिकाणी घर आणि सदनिका आहेत. विकास दुबेने केलेल्या परदेश दैाऱ्याबाबत चैाकशी करण्यात येणार आहेत.
विकास दुबे.jpg
विकास दुबे.jpg

कानपूर :  कानपूर येथे आठ पोलिसांची हत्या कऱणारा आणि सात दिवस पोलिसांना गुंगारा देणार कुख्यात गुंड विकास दुबे हा काल सकाळी पोलिसांच्या चकमकीत ठार झाला. आता त्यांच्या संपत्तीची माहिती संकलित केली जात आहे. ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) आता उत्तरप्रदेश पोलिसांकडून याबाबत माहिती मागितली आहे. ईडीने कानपूरचे पोलिस आयुक्त मोहित अग्रवाल यांना पत्र लिहिले आहे. विकास दुबे याचे लखनैा, कानपूर परिसरात अनेक ठिकाणी घर आणि सदनिका आहेत. विकास दुबेने केलेल्या परदेश दैाऱ्याबाबत चैाकशी करण्यात येणार आहेत. 

ईडीने आपल्या पत्रात म्हटले आहे की विकास दुबे याचे गुन्हेगारीतून मिळवलेली संपत्ती ही त्यांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर आहे. याबाबतची माहिती ईडीने कानपूर पोलिसांकडून मागवली आहे. त्याची घोषित आणि अघोषित संपत्तीची चैाकशी करण्यात येत आहे. सावकारीतून त्याने मिळवलेल्या संपत्तीची चैाकशी केली जाणार आहे. विकास दुबे याने गेल्या तीन वर्षात 15 देशामध्ये गेला होता. संयुक्त अरब अमीरात और थायलॅंडमध्ये त्यांने पेंट हाऊस खरीदी केले होते. त्याने नुकतीच लखनौमध्ये सुमारे 20 कोटी रूपयांची संपती खरेदी केली होती. ईडीने याबाबत उत्तरप्रदेश सरकराकडून याबाबत माहिती मागवली आहे. 


ईडीचे पथकाने काल कानपूर पोलिसांशी संपर्क साधला होता. विकास दुबे याच्याबाबत असलेल्या गुन्ह्याविषयीचे कागदपत्र घेऊन हे पथक लखऩैा येथे आले होते. त्याच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याची माहिती ईडीने घेतली आहे. उत्तरप्रदेशमध्ये त्याच्यावर तब्बल ६०  गुन्हे दाखल आहेत. यातील अनेक गुन्हे हे गंभीर स्वरूपाचे आहे. सावकारी कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल झाला तर कोट्यावधी रूपयांची संपत्ती उजेडात येईल, असे पोलिसांचे मत आहे.  
  
विकास दुबे याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला करण्यात आल्याची घटना कानपूर येथे २ जुलैला रात्री घडली होती. यात आठ पोलीस ठार झाले होते. विकास दुबे हे नाव पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले आहे. राजनाथसिंह यांचे सरकार उत्तर प्रदेशात असताना एका मंत्र्यांची हत्या केल्याचाही आरोप दुबे याच्यावर आहे. त्याच्यावर पाच लाखाचे इनाम लावण्यात आले होते. विकास दुबे हा उज्जैन येथे महाकाल मंदिरात दर्शनासाठी आला होता. तेव्हा तेथील सुरक्षारक्षकाने त्याला ओळखले. सुरक्षारक्षकाने पोलिसांना याबाबत कळविले. मध्यप्रदेश पोलिसांनी त्याला तेथून अटक केली आहे. कानपूर येथील चैाबेपूर येथे त्याला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांवर त्याने गोळीबार केला होता. यात एका पोलिस उपअधिक्षकासह आठ जण ठार झाले होते.  

उत्तरप्रदेश पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी दहा पथके तयार केली होती. गेल्या आठ दिवसांतील अनेक घडामोडींनंतर विकास दुबे अखेर मध्यप्रदेश पोलिसांच्या हाती लागला होता. काल सकाळी त्याला घेऊन येणाऱ्या वाहनांच्या ताफ्यातली एक जीप उलटली. त्यावेळी विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला शरण येण्याचे आवाहन केले. त्यावेळी चकमक घडली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात तो मरण पावल्याचे जाहीर करण्यात आले.       Edited  by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com