पावडर स्वरुपातील DRDOचे कोरोना औषध  2-DGचे आज वितरण... 

कोविड प्रतिबंधक औषधाला 2-DG केंद्र सरकारने नुकतीच मंजुरी दिली आहे.
3Sarkarnama_20Banner_20_202021_05_08T155412.741.jpg
3Sarkarnama_20Banner_20_202021_05_08T155412.741.jpg

नवी दिल्ली : डीआरडीओच्या इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लिअर मेडिसिन अँड अलाईड सायन्सेस INMAS व  हैदराबादच्या डॉ. रेड्डी लॅबोरिटरीजच्या  मदतीने तयार करण्यात आलेल्या  कोविड प्रतिबंधक औषधाला 2-DG केंद्र सरकारने नुकतीच मंजुरी दिली आहे. आज त्याचे वितरण होणार आहे.drdo launches covid 19 medicine 2 dg on today will be available to patients  

सरंक्षणमंत्री राजनाथ सिंह, आरोग्यमंत्री डॅा. हर्षवर्धन यांच्या हस्ते या औषधाचे वितरण होणार आहे. पावडरच्या स्वरुपात हे औषध आहे.  डीआरडीओच्या इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लिअर मेडिसिन अँड अलाईड सायन्सेस INMAS व  हैदराबादच्या डॉ. रेड्डी लॅबोरिटरीजच्या  मदतीने तयार करण्यात आलेल्या  कोविड प्रतिबंधक औषधाला 2-DG केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे  ड्रग्ज कन्ट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DGCI)ने 2-DG मंजुरी दिली आहे. याला देशात आपत्कालिन परिस्थितीत वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. याची ट्रायल ६ रुग्णालयांमध्ये घेण्यात आली, यामध्ये ११० रुग्णांवर याची चाचणी करण्यात आली. 2-DG क्लिनिकल ट्रायलमध्ये हे सिद्ध झालं आहे की, या औषधामुळे कोरोना रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यांना आँक्सिजन  देण्याची गरज भासली नाही. कोरोना रुग्णांसाठी हे  औषध खूप फायदेशीर ठरणार आहे. कोविड रोखण्यासाठी केलेल्या उपायामध्ये या औषधाची भर पडली आहे.

डीआरडीओ व डॉ. रेड्डी लॅबनं तयार केलेलं Drug 2-deoxy-D-glucose (2-DG) हे औषध आहे. याला देशात आपत्कालिन परिस्थितीत वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विविध घटकांना आवाहन केले होते. डिआरडिओ कोरोनाचे हे औषध २ डीजी तयार करण्यास प्रारंभ केला होता. 
 
एप्रिल २०२०मध्ये 2-DG य औषधावर काम करायला डिआरडिओने सुरुवात केली होती. त्यानंतर या औषधाची क्लिनिकल ट्रायल्स घेण्यात आली. यात हे औषध SARS-Cov-2 (कोविड-१९) या आजारावर प्रभावीपणे काम करत असल्याचे सिद्ध झाले.  या औषधाच्या फेज-२ मधील क्लिनिकल ट्रायलला मे २०२० मध्ये केंद्राकडून परवानगी देण्यात आली होती.  मे-ऑक्टोबर २०२० मध्ये डीआरडीओ आणि डॉ. रेड्डी यांनी मिळून फेज-२ च्या ट्रायलला सुरुवात केली होती. फेज-२ची ट्रायल ६ रुग्णालयांमध्ये घेण्यात आली यामध्ये ११० रुग्णांवर याची चाचणी झाली. 2-DGमुळे अनेक कोरोना रुग्णांचे प्राण वाचवू शकतील, असे तज्ज्ञांचे मत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com