खासदार म्हणाले, राज्यपालसाहेब आमच्यावर उपकार करा अन् दिल्लीतच राहा!

राज्यपाल मंगळवारीदिल्लीत दाखल झाले आहेत.
Do us a favour WB Governor dont come back says Mohua Moitra
Do us a favour WB Governor dont come back says Mohua Moitra

कोलकाता : पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर (Jagdeep Dhankhar) मंगळवारी दिल्लीत दाखल झाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनांबाबत ते दिल्लीत पंतप्रधानांसह गृहमंत्र्यांना भेटण्याची शक्यता आहे. यानंतर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महूआ मोईआ यांनी त्यांना टोला लगावला आहे. (Do us a favour WB Governor dont come back says Mahua Moitra)

महुआ मोईत्रा या सातत्याने राज्यपालांना लक्ष्य करतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राज्यपालांच्या खासगी सचिवांवरून त्यांच्यावर टीका केली होती. त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करत त्यांनी खासगी सचिवांच्या नियुक्तीबाबत खुलासा करण्याचे आवाहन केलं होतं. त्यावर राज्यपालांनी ट्विटरवरूनच ते सचिव माझ्या जातीचेही नसल्याचे म्हणत प्रत्युत्तर दिले होते. दोघांमधील ट्विटर वॅार त्यावेळी चांगलेच रंगले होते.

आता राज्यपाल दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्याची शक्यता आहे. त्यांना बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराचा अहवाल ते सादर करतील, अशी चर्चा आहे. भाजपनेही हा मुद्या उचलून धरल्याने सातत्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केलं जात आहे. तृणमूल काँग्रेसनेच हा हिंसाचार घडवून आणल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. तर ममतादीदींनी भाजपकडे बोट दाखविले आहे. 

दिल्लीत जाणार असल्याची माहिती राज्यपालांनीच ट्विटरवरून दिली होती. त्यानंतर मोईत्रा यांनी ट्विट करत राज्यपालांना टोला लगावला. 'अंकलजी 15 जूनला दिल्लीला जात आहेत. आमच्यावर उपकार करा, परत येऊ नका,' असं मोईत्रा यांनी म्हटलं आहे. त्यावरूनही आता राजकारण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

दरम्यान, निकालानंतर बंगालमध्ये अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण करून खून करण्यात आले. महिलांवर अत्याचार करण्यात आले, असे अनेक गंभीर आरोप भाजपने केले आहेत. या हिंसाचारामध्ये तृणमूलच्या काही कार्यकर्त्यांचाही मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. या हिंसाचारानंतर राज्यपालांनी राज्याच्या मुख्य सचिवांसह पोलिस महासंचालकांची बैठक घेतली. केंद्रीय गृह मंत्रालयाचे एक पथक हिंसाचार झालेल्या भागाची पाहणीही करून गेले आहे. 

राज्यपाल धनखर यांच्याकडून सातत्याने ममता बॅनर्जी यांनाही लक्ष्य केलं जात आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती चांगली नसल्याचा आरोप करत त्यांनी राज्यात लोकशाही श्वास घेऊ शकत नाही, असा आरोप केला आहे. राज्यातील स्थिती खूपच चिंताजनक असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. यापार्श्वभूमीवर राज्यपाल काल रात्री दिल्लीत दाखल झाले. ता. 18 जूनपर्यंत ते दिल्लीतच राहणार असल्याची माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com