नितीश कुमार देणार काँग्रेसला धक्का; १३ आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत...

लोजपला धक्का दिल्यानंत आता जेडीयूने काँग्रेसला झटका देण्याची तयारी सुरु केली आहे.
 Congress .jpg
Congress .jpg

पटना : बिहारमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. पुन्हा फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. लोक जनशक्ती पक्षाचे (Lok Janshakti Party) अध्यक्ष चिराग पासवान (Chirag Paswan) यांच्याविरोधात पक्षाच्या पाच खासदारांनी (MP) बंड (Revolt) केले आहे. त्यामुळे या खासदारांनी लोकसभेत (Loksabha) चिराग पासवान यांच्याऐवजी त्यांचे काका पशुपतीकुमार पारस (Pashupati Kumar Paras) यांना पक्षाचा नेता निवडले आहे. या सगळ्या घडामोडींमागे सत्ताधारी संयुक्त जनता दल (जेडीयू) असल्याचे बोलले जाते. लोजपला धक्का दिल्यानंत आता जेडीयूने काँग्रेसला झटका देण्याची तयारी सुरु केली आहे. (Discussion that 13 Congress MLAs will leave the party in Bihar)

बिहारच्या राजकीय वर्तुळात सध्या ऑपरेशन काँग्रेसची चर्चा आहे. हे ऑपरेशन पुर्ण करण्याची जबाबदारी काँग्रेसमधून या आधी जेडीयूमध्ये प्रवेश केलेल्या एका मंत्र्यांवर देण्यात आली आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे १९ उमेदवार विजयी झाले आहेत. पक्षांतरबंदी कायद्याचे उल्लंघन टाळण्यासाठी जेडीयूला १३ मदारांची गरज आहे. काँग्रेसचे १९ पैकी १० आमदार जेडीयूमध्ये जाण्यास तयार असल्याचे समजते.

विधानसभेतील पक्षाच्या एकूण आमदार संख्येपैकी दोन तृतीयांश आमदारांनी पक्ष पदलल्यास तांत्रिक अडचण येत नाही. जेडीयूमध्ये प्रवेश करण्यासाठी काँग्रेसच्या १३ आमदारांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जर आमदारांचे मन वळवण्यास जेडीयूला यश आले तर बिहारमध्ये लोजपानंतर आणखी एक मोठा पक्ष फुटण्याच्या स्थितीत असेल. काँग्रेसचे अनेक नेते जेडीयू नेत्यांचसोबत चर्चा करत आहेत. 

काही दिवसापूर्वी हिंदुस्तान अवाम मोर्चाचे अध्यक्ष जीतन राम मांझी आणि मुकेश सहानी यांच्या विधानांमुळे एनडीएमध्ये वातावरण तापले होते. जीतन राम मांझी मागील काही दिवसांपासून समन्वयक समितीच्या बैठकीची मागणी करत भाजप नेत्यांवर हल्लाबोल करत असल्याने एनडीएत खळबळ माजली आहे. लालूप्रसाद यादव यांच्या वाढदिवशी मांझी तेजप्रताप यादव यांच्या घरी पोहचले होते. तिथे त्यांनी लालू यांच्यासोबत फोनवरून १० मिनिटे संवाद साधला. त्यामुळे काँग्रेस फुटली तर सहकारी पक्षांवर अंकुश ठेवणे एनडीएला सोयीस्कर जाईल असे सांगितले जात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com