"कोरोना वाढला की सुशांत..सुशांत"...शेतकरी रस्त्यावर आले की “दीपिका-दीपिका...”  - Digvijay Singh targets Prime Minister Narendra Modi | Politics Marathi News - Sarkarnama

"कोरोना वाढला की सुशांत..सुशांत"...शेतकरी रस्त्यावर आले की “दीपिका-दीपिका...” 

वृत्तसंस्था
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

काँग्रेस ज्येष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली : काँग्रेस ज्येष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे. दिग्विजय सिंह यांनी प्रसारमाध्यमांवर देखील टीका केली आहे. प्रसारमाध्यमांना उल्लेख त्यांनी गोदिमीडिया असा केला आहे. याबाबत दिग्विजय सिंह यांनी टि्वट केलं आहे. या टि्वटची चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे. 

देशातील महत्वाचे प्रश्नांकडे दुर्लक्ष करून मीडियाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी देशातील महत्वाच्या मुद्दांकडे दुर्लक्ष करतात, हा सर्व प्रकार पूर्वनियोजित आहे. "कोरोना रूग्णांची संख्या वाढली की सुशांत सुशांत.. " चीनने आपले सैनिक मारले तेव्हा "रिया रिया.." जीडीपी 23 टक्के तेव्हा “कंगना-कंगना...”, शेतकरी रस्त्यावर आले तेव्हा “दीपिका-दीपिका...” असा प्रकार सध्या सुरू आहे, अशी टीका त्यांनी मोदी आणि प्रसारमाध्यमांवर केली आहे. यासाठीच मोदींना “सपनों का सौदागर.. ” म्हणतात, अशी खोचक टिप्पणीही दिग्विजय सिंह यांनी केली आहे. प्रसारमाध्यमांवरही त्यांनी जोरदार टीका केली आहे. प्रसारमाध्यमांचा उल्लेख त्यांनी #गोदिमीडिया असा केला आहे.  

दिग्विजय सिंह एका दुसऱ्या टि्वटमध्ये म्हणतात की कोरोनाच्या संसर्गामुळे देशात हजारो नागरिकांचा मृत्यू होत आहे. केंद्रीय मंत्री आणि खासदार यांच्या मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. काही मंत्री रूग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोनाना रूग्णांना रूग्णालयाच बेड मिळत नाही. पण वृत्तवाहिन्यांवर मात्र, बॅालीवुडचे कलाकार कसे ड्रग्ज घेत आहेत, यावर चर्चा सुरू आहे.   

मला एकट्याला जाऊन मोदींना भेटणं शक्य झालं असतं..पण..

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खासदार संभाजीराजे छत्रपती यांना भेटण्यासाठी वेळ देत नसल्याच्या निषेधात काल कोल्हापूर महानगरपालिकेतील सभा तहकूब करण्यात आली. मराठा आरक्षणाबाबतची भूमिका पंतप्रधान मोदी स्पष्ट करत नाहीत. याविषयाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कोल्हापूर महानगरपालिकेतील सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेने केला आहे. महापौर निलोफर आजरेकर यांनी याबाबतची भूमिका मांडली. या पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुकवरून एक पत्र प्रसिद्ध केलं आहे. या पत्रात संभाजी राजे यांनी म्हटलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींना मला एकट्याला जाऊन भेटणं आणि श्रेय घेणं शक्य झालं असतं. मी ठरवलं तर कधीही भेटू शकतो. पण मला मराठा आरक्षणाच्या लढ्यात श्रेयवाद आणायचा नाही. हा लढा सर्वांचा आहे. मला एकट्याला जाऊन भेटणं आणि श्रेय घेणं शक्य झालं असतं. मी ठरवलं तर कधीही भेटू शकतो. पण मला मराठा आरक्षणाच्या लढ्यात श्रेयवाद आणायचा नाही. हा लढा सर्वांचा आहे. तो सर्वांना सोबत घेऊन लढायचा आहे.    
 
 Edited  by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख