दिग्वीजयसिंह म्हणतात,"" 2024 मध्ये भारतालाही एका बायडेनची गरज आहे !''  - Digvijay Singh says, "India needs a Biden in 2024 too!" | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

दिग्वीजयसिंह म्हणतात,"" 2024 मध्ये भारतालाही एका बायडेनची गरज आहे !'' 

वृत्तसंस्था
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

दिग्वीजयसिंह यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे, की 2024 आम्हालाही असा एका नेता मिळावा.

नवी दिल्ली : अमेरिकेच्या अध्यक्षपदी डेमॉक्रटिक पक्षाचे उमेदवार जो. बायडेन विजयी झाल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा जगभरातून वर्षाव होत आहे.

तसे अभिनंदन करणाऱ्यांमध्ये कॉंग्रेसचे एक ज्येष्ठ नेते दिग्वीजयसिंह यांचाही समावेश. मात्र त्यांनी बायडेन यांना शुभेच्छा देताना भारतालाही असे एक बायडेन मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. 

दिग्वीजयसिंह यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे, की 2024 आम्हालाही असा एका नेता मिळावा. जो बायडेन यांच्यासारखा असावा. संपूर्ण अमेरिकन नागरिकांनी जो. बायडेन यांना निवडून दिले आहे. त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. त्याबद्दल अमेरिकन जनतेचेही अभिनंदन केले पाहिजे.

बायडेन हे अमेरिकेला एकसंघ ठेवतील आणि विभाजन होऊ देणार नाही.2024 जर भारतालाही एक बायडेन मिळाला तर देशाचे चित्र बदलेले दिसेल.भारतातही तसे प्रयत्न व्हायला हवेत आणि जातीयवादी आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या मंडळींचा पराभव व्हायला हवा. आम्ही प्रथम भारतीय आहोत असेही त्यांनी म्हटले आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करून विजयी झालेले बायडेन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी अभिनंदन केले आहे. दिग्वीजयसिंह यांनीही अभिनंदन केले मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका करण्याची संधी सोडली नाही. 

हे ही वाचा : 
ट्रम्प यांना दे धक्का...अमेरिकेच्या अध्यक्षपदी बायडेन

वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये व्हाइट हाऊससाठीच्या उत्कंठावर्धक शर्यतीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन हे अखेर विजयी ठरले आहेत. त्यांनी मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला आहे. ट्रम्प यांचे दुसऱ्या टर्मचे स्वप्न बायडेन यांनी धुळीस मिळवले आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सलग दुसरी टर्म न भूषवणारे डोनाल्ड ट्रम्प हे मागील 30 वर्षांतील पहिले अध्यक्ष ठरले आहेत. 

दरम्यान, आज सकाळी देशाला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये बायडेन यांनी विजयाचा निर्धार व्यक्त केला होता. तरीसुद्धा ट्रम्प मात्र माघार घ्यायला तयार नव्हेत. अनेक राज्यांतील मतमोजणी सुरू होती. त्यामुळे बायडेन यांच्या विजयाची केवळ औपचारिकताच शिल्लक होती. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख