वाह महाराज वाह...! दिग्विजय सिंह व ज्योतिरादित्य यांच्यात संसदेतच जुंपली

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर राज्यसभेत गुरूवारी चर्चा झाली. या चर्चेदरम्यान काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह व भाजपचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यातच जुंपल्याचे पाहायला मिळाले.
Digvijay Singh and Jyotiraditya clashed in Parliament over farmers protest
Digvijay Singh and Jyotiraditya clashed in Parliament over farmers protest

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर राज्यसभेत गुरूवारी चर्चा झाली. या चर्चेदरम्यान काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह व भाजपचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यातच जुंपल्याचे पाहायला मिळाले. कृषी कायद्यांवरून दोघांनीही एकमेकांवर टीका-टिप्पणी केली. भाजपची बाजू चांगली मांडल्याबद्दल दिग्विजय सिंह यांनी ज्योतिरादित्य यांना 'वाह महाराज वाह' असे म्हटले. त्यावर ज्योतिरादित्य यांनीही तुमचाच आशिर्वाद असल्याचे बोलत चिमटा काढला. 

ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मागील वर्षीच काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपवासी झाले आहेत. ते सध्य राज्यसभेचे खासदार आहेत. काँग्रेसमध्ये असताना दिग्विजय सिंह यांच्यासोबत त्यांनी अनेक वर्ष काम केले आहे. गुरूवारी राज्यसभेत या दोघांमधील जुगलबंदी पाहायला मिळाली. ज्योतिरादित्य यांनी कृषी कायद्यांवरून काँग्रेसवर दुटप्पीपणा आरोप लावला. 

ज्योतिरादित्य यांच्या भाषणानंतर लगेचच दिग्विजय सिंह बोलायला उठले. ज्योतिरादित्य यांना उद्देशून ते म्हणाले, 'मी तुम्हाला शुभेच्छा देतो. यूपीए सरकारच्या काळात तुम्ही ज्यापध्दतीने यूपीएची बाजू संसदेत मांडत होता, त्याच पध्दतीने आज भाजपची बाजू मांडली. वाह जी महाराज वाह.' ज्योतिरादित्य यांनीही लगेच प्रत्युत्तर देत हा तुमचाच आशीर्वाद असल्याचे सांगत चिमटा काढला. माझा आशिर्वाद आधीही तुमच्या सोबत होता, यापुढेही राहील, असे म्हणत दिग्विजय सिंह यांनी ज्योतिरादित्य यांना टोला लगावला. 

दरम्यान, कृषी कायद्यांवर बोलताना ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले, काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यात कृषी सुधारणांना महत्व देण्यात आले होते. तत्कालीन कृषी मंत्री शरद पवार यांनी 2010-2011 मध्ये देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. कृषीमध्ये खाजगी क्षेत्राची भागीदारी गरजेची आहे. त्यासाठी एपीएमसी कायद्यात सुधारणा करायला हवी, असे पत्रात म्हटले होते. शब्द फिरविण्याची सवय आता बदलायला हवी.

काँग्रेससह इतर विरोधी पक्षांच्या खासदारांनी राज्यसभेत भाजपवर जोरदार टीका केली. 'शेतकरी तुम्हाला चंद्र मागत नाही. ते त्यांचा हक्क मागत आहेत. कोणीही सत्तेत असले तरी शेतकरी हिताचे निर्णय व्हायला हवेत. दिल्लीच्या सीमेवर करण्यात आलेली सुरक्षा पाहून देशाच्या सीमेवरील चित्र असल्याचे दिसते. शेतकरी व सरकारमध्ये 11 बैठका झाल्या आहेत. पण संवाद होताना दिसत नाही,' असे ठीका विरोधकांनी केली. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com