Denmark permanently stop administering the AstraZeneca vaccine
Denmark permanently stop administering the AstraZeneca vaccine

अॅस्ट्राझेनेकाच्या लशीवर या देशाने घातली कायमची बंदी; भारतात 'सिरम' करते उत्पादन

काही देशांमध्ये अॅस्ट्राझेनेकाची लस घेतल्यानंतर रक्तात गुठळ्या होत असल्याच्या तक्रारी येत होत्या.

कोपनहेगन : अॅस्ट्राझेनेकाची कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर रक्तात गुठळ्या होत असल्याच्या तक्रारीनंतर युरोपातील अनेक देशांनी काही दिवसांपूर्वी या लशीचा वापर थांबविला होता. पण जागतिक आरोग्य संघटनेने ही लस सुरक्षित असल्याचे स्पष्ट केल्यानंतर पुन्हा या लशीचा वापर सुरू झाला. पण युरोपातील डेन्मार्क या देशाने मात्र अॅस्ट्राझेनेकाच्या लशीवर कायमची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. 

अॅस्ट्राझेनेका व अॅाक्सफर्ड विद्यापीठाने कोरोनावरील लसीची निर्मिती केली आहे. जगातील अनेक देशांमध्ये या लसीचा वापर केल जात आहे. भारतातही कोविशिल्ड नावाने ही लस वितरीत केली जात आहे. सिरम इन्स्टिट्युटकडून या लशीचे उत्पादन केले जात आहे. अॅस्ट्राझेनेकाची लस घेतल्यानंतर रक्तामध्ये गुठळ्या होत असल्याच्या तक्रारी काही देशांमध्ये समोर आल्या होत्या. प्रामुख्याने युपोतील अनेक देशांनी काही काळ या लशीचा वापर थांबवला होता. 

जागतिक आरोग्य संघनेने लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे स्पष्ट केल्यानंतर लशीचा पुन्हा वापर सुरू झाला. पण डेन्मार्कने या लशीचा वापर कायमचा थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. रक्तात गुठळ्या झाल्याच्या तुरळक पण गंभीर तक्रारी आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. डेन्मार्कमधील साथ नियंत्रणात आहे. फायझर आणि मॅाडर्ना या लशींचा वापर देशात सुरू आहे.  या लशीला लसीकरण कार्यक्रमातून वगळण्यात आल्याचे आरोग्य प्राधिकरणाचे संचालक सोरेन ब्रोस्ट्राम यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. 

डेन्मार्कने 11 मार्चपासून या लशीचा वापर थांबवला होता. तसेच फ्रान्स, जर्मनी, इटलीसह अन्य काही युरोपीय देशांनी काही काळासाठी लशीच्या वापराला स्थगिती दिली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा वापर सुरू करण्यात आला. पण डेन्मार्क या एकमेव देशाने वापर बंदच ठेवला होता. आता या लशीवर कायमची बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयामुळे अॅस्ट्राझेनेकाला धक्का बसला आहे. 

अॅस्ट्राझेनेकाची लस घेतल्यानंतर गंभीर दुष्परिणाम जाणवत असल्याचे शास्त्रीय अभ्यासातून समोर आले आहे. डेन्मार्कची परिस्थिती सध्याच्यापेक्षा अधिक गंभीर असती आणि आरोग्य यंत्रणेवर खूप ताण असता तर या लशीचा वापर सुरू ठेवला असतो, असेही ब्रोस्ट्राम यांनी स्पष्ट केले. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com