प्रकाश जावडेकर म्हणतात, बाबरी पाडून ती ऐतिहासिक चूक सुधारली'! 

राम मंदिरामध्ये भारताचा आत्मा वसतो, हे परकीय आक्रमकांना माहिती होते. त्यामुळे त्यांनी राम मंदिर उध्वस्त केले.
By demolishing babari Historical Mistake Ended says Prakash jawdekar
By demolishing babari Historical Mistake Ended says Prakash jawdekar

नवी दिल्ली : राम मंदिरामध्ये भारताचा आत्मा वसतो, हे परकीय आक्रमकांना माहिती होते. त्यामुळे त्यांनी राम मंदिर उध्वस्त केले. अयोध्यातील बाबरी मशीद 6 डिसेंबर 1992 ला पाडून ऐतिहासिक चूक सुधारण्यात आली, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले आहे.

दिल्लीमध्ये श्री राम जन्मभूमी मंदिर निधी समर्ण अभियानाच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. ते म्हणाले, भारतात आलेल्या बाबरने राम मंदिर उध्दस्त करण्यासाठी निवडले. मंदिर पाडून त्याने तिथे वादग्रस्त वास्तू उभारली. असे ठिकाण जिथे धार्मिक कार्य केले जात नाही, ती मशिद असू शकत नाही. 

देशात 6 डिसेंबर 1992 रोजी जेव्हा इतिहास घडत होता, तेव्हा मी त्याचा साक्षीदार होतो. तेव्हा मी भारतीय जनता युवा मोर्चामध्ये काम करत होतो. अयोध्यामध्ये कारसेवक बनून गेलो. तिथे लाखो कारसेवक होते. त्या रात्रीआधी आम्ही त्याच परिसरात झोपलो  होतो. दुसऱ्या दिवशी संपुर्ण देशाने इतिहासात झालेली चूक सुधारताना पाहिले, असे जावडेकर म्हणाले.

हेही वाचा : तुम्ही मला बंदूक दाखवाल तर तुम्हाला मी दारूगोळाच दाखवेन!

कोलकता : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्याने तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संताप व्यक्त करीत त्यांचे भाषण थांबवले होते. या प्रकरणावर ममतांनी अखेर मौन सोडले आहे. त्यांनी कार्यक्रमातील गोंधळासाठी त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना जबाबदार धरले आहे. 

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ जयंतीनिमित्त 23 जानेवारील पश्चिम बंगालध्ये राजकीय मानापमान नाट्य रंगले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत व्हिक्टोरिया मेमोरिअलमध्ये झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सहभागी झाल्या होत्या. त्या बोलत असताना उपस्थितांमधून जय श्रीरामची घोषणाबाजी झाल्याने त्या संतापल्या होत्या. पंतप्रधानांसमोरच त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत भाषण थांबवले होते. 

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com