अॅालिम्पिक पदक विजेता सुशील कुमारला हत्येप्रकरणात अटक

सुशील कुमारसह त्याचा साथीदार अजय उर्फ सुनील यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
Delhi Police Special Cell arrested Wrestler Sushil Kumar
Delhi Police Special Cell arrested Wrestler Sushil Kumar

नवी दिल्ली : देशाला अॅालिम्पिक पदक मिळवून देणारा कुस्तीपटू सुशील कुमारला पोलिसांनी आज अटक केली आहे. माजी ज्युनियर नॅशनल चॅम्पियनच्या हत्येप्रकरणात पोलिस त्याचा मागील काही दिवसांपासून शोध घेत होते.  पोलिसांनी त्याला फरारही घोषित केले होते. त्याला शोधून देणाऱ्यास एक लाखाच्या बक्षीसाची घोषणा करण्यात आली होती. अखेर आज त्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली. (Delhi Police Special Cell arrested Wrestler Sushil Kumar)

सुशील कुमारसह त्याचा साथीदार अजय उर्फ सुनील यालाही पोलिसांनी अटक केली आहे. दिल्लीमध्ये छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंगमध्ये पाच मे रोजी कुस्तीमटूंच्या दोन गटांत झाली होती. या मारहाणीत पाच जण गंभीर जखमी झाले. त्यापैकी माजी ज्युनियर नॅशनल चॅम्पियन सागर धनखडचा उपचारादरम्यन मृत्यू झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यात सुशील कुमारचेही नाव आहे. 

दरम्यान, सुशील कुमारचा या हत्याकांडात सहभाग असल्याचे पुरावे पोलिसांकडे आहेत. घटनेनंतर दिल्ली पोलिस सुशील कुमारचा शोध घेत होते. त्याच्या घरावरही छापा मारण्यात आला. पण तो तिथे सापडला नाही. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी अनेकांची चौकशी केली आहे. मात्र, त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. सुशील कुमार दिल्ली आणि हरियाणा दरम्यान आपले ठिकाण बदलत असल्याचा संशय पोलिसांना होता.

स्टेडियममधील घटनेनंतर सुशील कुमार सुरूवातीला हरिव्दार आणि नंतर ऋषिकेशला गेला होता. हरिद्वारमधील एका आश्रमात तो थांबला होता. त्यानंतर तो दिल्लीत परतला. तिथून तो हरियाणा गेला. तो सातत्याने ठिकाणे बदलत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सुशील कुमार परदेशात पळून जाण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी केली आहे. अटकपूर्व जामीनासाठी सुशील कुमार दाखल केलेला अर्जही न्यायालयाने फेटाळला होता. अखेर आज पोलिसांनी त्याला दिल्लीतील मुंडका परिसरातून अटक केली. 


Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com