अॅालिम्पिक पदक विजेता सुशील कुमार फरार; युवा कुस्तीपटूच्या हत्येप्रकरणात लूक आऊट नोटीस - Delhi police issue Lookout Notice for Wrestler sushil kumar in murder case | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

अॅालिम्पिक पदक विजेता सुशील कुमार फरार; युवा कुस्तीपटूच्या हत्येप्रकरणात लूक आऊट नोटीस

वृत्तसंस्था
सोमवार, 10 मे 2021

दिल्लीमध्ये छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंगमध्ये पाच मे रोजी कुस्तीमटूंच्या दोन गटांत धुमश्चक्री झाली होती.

नवी दिल्ली : देशाला अॅालिम्पिक पदक मिळवून देणारा कुस्तीपटू सुशील कुमार चांगलाच अडचणीत आला आहे. माजी ज्युनियर नॅशनल चॅम्पियनच्या मृत्यूप्रकरणात पोलिसांनी सुशील कुमारला लूक आऊट नोटीस बजावली आहे. त्याच्यावर हत्येचा आरोप करण्यात येत असून पोलिसांची पथकं त्याचा शोध घेत आहेत. देशातील सर्व विमानतळांवरील सुरक्षा दलांना सतर्क करण्यात आले आहे. (Delhi police issue Lookout Notice for Wrestler Sushil kumar in murder case)

दिल्लीमध्ये छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंगमध्ये पाच मे रोजी कुस्तीमटूंच्या दोन गटांत धुमश्चक्री झाली होती. या मारहाणीत पाच जण गंभीर जखमी झाले. त्यापैकी माजी ज्युनियर नॅशनल चॅम्पियन सागर धनखडचा उपचारादरम्यन मृत्यू झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यात सुशील कुमारचेही नाव आहे. प्रॅापर्टीच्या वादातून हा प्रकार घडल्याचे सुत्रांनी सांगितले. 

हेही वाचा : दिवसभर रुग्णसेवा केली...रात्री कोरोना पॅाझिटिव्ह अन् पहाटे तरुण डॅाक्टरचा मृत्यू

दरम्यान, सुशील कुमारचा या हत्याकांडात सहभाग असल्याचे पुरावे पोलिसांकडे आहेत. घटनेनंतर दिल्ली पोलिस सुशील कुमारचा शोध घेत आहेत. त्याच्या घरावरही छापा मारण्यात आला. पण तो तिथे सापडला नाही. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी अनेकांची चौकशी केली आहे. मात्र, त्याचा ठावठिकाणा लागत नाही. सुशील कुमार दिल्ली आणि हरियाणा दरम्यान आपले ठिकाण बदलत असल्याचा संशय पोलिसांना आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टेडियममधील घटनेनंतर सुशील कुमार सुरूवातीला हरिव्दार आणि नंतर ऋषिकेशला गेला होता. हरिद्वारमधील एका आश्रमात तो थांबला होता. त्यानंतर तो दिल्लीत परतला. तिथून तो हरियाणा गेला. तो सातत्याने ठिकाणे बदलत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सुशील कुमार परदेशात पळून जाण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी आज त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी केली आहे. 

स्टेडियममधील मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओही पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याआधारे पोलिसांनी सुशील कुमारचा कसून शोध सुरू केला आहे. स्टेडियमध्ये काम करणाऱ्या अनेकांनी या मारहाणीबाबत सुशील कुमार व त्याच्या साथीदारांकडेच बोट दाखवले आहे. सुशील कुमारसह अजय, प्रिन्स दलला, सोनू महाल, सागर आणि अमित यांच्यात वाद झाल्याचे बोलले जात आहे.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख