दिल्ली उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला फटकारले; लस नसताना कॉलरट्यून ऐकावी लागते

आता लोकांना देण्यासाठी तुमच्याकडे लशीच नाहीत तरीसुद्धा तुम्ही मात्र लसीकरण (Vaccination) करू असे सांगत आहात.
 The Delhi High Court .jpg
The Delhi High Court .jpg

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) आज केंद्र सरकारच्या (central government) लसीकरण धोरणावर कठोर शब्दांत ताशेरे ओढले. ''सध्या तुमच्याकडे लोकांना देण्यासाठी पुरेशा लशी नाहीत पण एखाद्या व्यक्तीने दुसऱ्याला फोन केला असता तिला लसीकरणाची कंटाळवाणी कॉलर ट्यून ऐकावी लागते.'' अशा शब्दांत न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले आहे. (The Delhi High Court slammed the central government)

न्यायालय म्हणाले, ''आता लोकांना देण्यासाठी तुमच्याकडे लशीच नाहीत तरीसुद्धा तुम्ही मात्र लसीकरण (Vaccination) करू असे सांगत आहात. लशींचा साठाच नसेल तर लसीकरण कोण करणार?'' असा सवालही न्यायालयाकडून करण्यात आला. तुरुंगामध्ये कैद्यांच्या भेटीसाठी जाणाऱ्या वकिलांच्या लसीकरणाच्या मुद्यावर आज न्यायालयात सुनावणी झाली.  ''एखाद्या व्यक्तीला बंदूक न देताच युद्धाच्या आघाडीवर पाठविता येणार नाही.'' असे मतही न्यायालयाने यावेळी मांडले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच न्यायालयीन अधिकारी आणि वकील काम करत असल्याने त्यांचे संरक्षण होणे गरजेचे असल्याचे न्यायालयाने म्हटले.

याचिकाकर्त्यांची मागणी

दिल्ली राज्य वैधानिक सेवा प्राधिकरणाने याबाबतची याचिका दाखल केली होती. जिल्हा न्यायालयांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या लसीकरण केंद्रांवर वकील आणि न्यायालयीन अधिकाऱ्यांचे देखील लसीकरण केले जावे, यासाठी तसे निर्देश केंद्र आणि दिल्ली सरकारला देण्यात यावे, अशी मागणी याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली होती. यावर केंद्र सरकारने सांगितले, की  ''फ्रंटलाइन वर्करच्या श्रेणींमध्ये सध्या वकिलांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात आलेले नाही, त्यामुळे देशभरातील वकिलांचे लसीकरण हा सगळ्याच्याच दृष्टीने चिंतेचा विषय आहे.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com