रामदेव बाबांना उच्च न्यायालयाने फटकारले..चुकीच्या विधानाबाबत नोटीस.. - delhi high court hearing on delhi medical association plea against ramdev baba | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

रामदेव बाबांना उच्च न्यायालयाने फटकारले..चुकीच्या विधानाबाबत नोटीस..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 3 जून 2021

"कोरोनीलचा प्रचार करा पण अँलोपॅथीबाबत चुकीचे विधान करु नका,"

नवी दिल्ली :  अँलोपॅथीवरुन सुरू असलेला वाद आता दिल्ली उच्च न्यायालायात गेला आहे. रामदेव बाबा यांच्याविरोधात दिल्ली मेडिकल असोसिएशनने (DMA)याचिका दाखल केली आहे. पंतजलीच्या कोरोनील बाबत रामदेव बाबांनी केलेल्या चुकीच्या दावा आणि अँलोपॅथीबाबत केलेल्या चुकीच्या विधानाबाबत ही याचिका दाखल करण्यात आली. याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्चन्यायालयाने रामदेव बाबांना नोटीस बजावली आहे. याबाबत उत्तर मागितलं आहे. "कोरोनीलचा प्रचार करा पण अँलोपॅथीबाबत चुकीचे विधान करु नका," असे न्यायालयाने रामदेव बाबांना सुनावले.  delhi high court hearing on delhi medical association plea against ramdev baba 

दिल्ली उच्च न्यायालयाने याचिकेच्या सुनावणीत 'डिएमए'ला सांगितले की, न्यायालयात वेळ घालविण्याबाबत तुम्ही कोरोनाला रोखण्यासाठी संशोधन करण्यात वेळ घालवा. यावर डिएमएने न्यायालयात सांगितलं की कोरोनावर कोरोनील हे रामबाण उपाय असल्याचा रामदेव बाबा दावा करीत आहेत. यावर न्यायालयाने त्यांना सुनावले की तुम्हीच सांगितलं की कोरोनील बाबतचा दावा चुकीचा आहे, तर तुम्ही कशाला त्याचा विचार करता. कोरोनावर उपाय करण्यासाठी कोरोनील योग्य की अयोग्य हे वैद्यकीय तज्ज्ञ ठरवितील, आम्ही रामदेव बाबांच्या उत्पादनांवर बंदी घालू शकत नाही. रामदेव बाबांच्या मतानुसार त्यांच्या अँलोपॅथीवर विश्वास नाही, त्यांना योग आणि आयुवैद योग्य वाटते. हे चुकीचे किंवा बरोबरही असू शकते. अँलोपॅथी कुणासाठी चांगली किंवा वाईट ठरु शकते हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे. आम्ही याबाबत रामदेव बाबांना नोटीस पाठवू शकतो पण  त्यांचा उत्पादनांवर बंदी घालू शकत नाही,असे न्यायालयाने खडसावले.  

उत्तराखंडच्या इंडिअन मेडिकल असोसिएशन शाखेकडून (IMA) रामदेव बाबांवर १ हजार कोटींचा मानहानी दावा करण्यात आला आहे. आयएमएने रामदेव बाबांना याबाबतची नोटीस पाठविली आहे.  असोसिएशनचे सचिव डॉ. अजय खन्ना म्हणाले की, रामदेव बाबांना अॅलोपथी मधले अ सुद्धा माहिती नाही. आम्ही त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ पण त्यापूर्वी त्यांनी आपली योग्यता सिध्द करावी. आम्ही रामदेवबाबांना १५ दिवसाची मुदत दिली आहे. या वेळात त्यांनी केलेल्या विधानांबद्दल माफी मागावी अन्यथा आम्ही त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार आहोत.

आयएमएने त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. सध्या सोशल मीडियावर रामदेव बाबा यांना अटक करा, असा हॅशटॅश सुरु आहे. त्यावर रामदेव बाबा यांनी काल म्हटले, "मला त्यांचा बापही अटक करु शकत नाही. " यावर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उडवली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख