लैंगिक शोषण प्रकरणात माजी केंद्रीय मंत्र्यांना न्यायालयाचा झटका...

महिला पत्रकाराने भाजपचे माजी केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्र्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता.
Delhi Court acquits journalist in criminal defamation case filed by former Union Minister
Delhi Court acquits journalist in criminal defamation case filed by former Union Minister

नवी दिल्ली : महिला पत्रकाराने भाजपचे माजी केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. या आरोपांनंतर अकबर यांनी संबंधित पत्रकाराविरूद्द मानहानीचा दावा दाखल केला. हा दावा दिल्लीतील न्यायालयाने फेटाळून लावत महिला पत्रकाराला निर्दोष ठरविले. त्यामुळे अकबर यांना जोरदार झटका बसला आहे.

पत्रकार प्रिया रमानी यांनी २०१८ मध्ये अकबर यांच्यावर आरोप केले होते. २०१८ मध्ये मीटू चळवळीअंतर्गत ट्विट करून लैंगिक शोषणाचा मुद्दा पुढे आणला होता. त्यावेळी अकबर हे केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री होते. या प्रकरणानंतर त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे चिडलेल्या अकबर यांनी रमानी यांच्याविरुध्द मानहानीचा दावा दाखल केला. 

आज न्यायालयाने या प्रकरणावर अंतिम निकाल दिला. त्यामुळे अकबर यांचा दावा फेटाळत न्यायालयाने रमानी यांना दोषी ठरविण्यास निकाल दिला. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी रविंद्र कुमार यांनी अकबर आणि रमानी यांची बाजू ऐकून घेतली. त्यानंतर निकाल देताना न्यायालय म्हणाले की, लैंगिक शोषण केवळ बंद दरवाजाआडच होत नाही. लैंगिक शोषणाच्या तक्रारी करण्यास अनेक महिला घाबरतात. महिलांना कलंक लागण्याची किंवा चारित्र्यहनन होण्याची भिती वाटत असल्याने त्या पुढे येत नाहीत, असेही न्यायालयाने सांगितले. 

काय आहे प्रकरण?

२०१८ मध्ये मीटू चळवळींतर्गत रमानी यांनी अकबर यांच्याबाबत एक ट्विट केले होते. ''२० वर्षांपूर्वी अकबर हे एका इंग्रजी दैनिकाचे संपादक असताना नोकरीसाठी त्यांना भेटले होते. यावेळी त्यांनी लैंगिक शोषण केले होते,'' असे रमानी यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. या आरोपानंतर या प्रकरणाची खूप चर्चा झाली. त्यामुळे अकबर यांना १७ अॉक्टोबर २०१८ रोजी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्याआधी अकबर यांनी रमानी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. रमानी या माझ्यावरील आरोप सिध्द करण्यास अपयशी ठरल्याचे अकबर यांनी न्यायालयात सांगितले होते. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com