भाजप नेतृत्वामुळेच बंगालमध्ये पराभव; सुवेंदू अधिकारींचा खळबळजनक आरोप - The defeat of the BJP in West Bengal was due to the overconfidence of the BJP leaders  | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप नेतृत्वामुळेच बंगालमध्ये पराभव; सुवेंदू अधिकारींचा खळबळजनक आरोप

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 19 जुलै 2021

अधिकारी यांच्या या वक्तव्यावर तृणमूल काँग्रेसचे कुणाल घोष यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) झालेला भाजपचा पराभव विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांच्या जिव्हारी लागला आहे. सुवेंदू अधिकारी यांनी अती आत्मविश्वास असणाऱ्या नेत्यांना बंगालमधील पराभवासाठी जबाबदार धरले आहे. काही नेत्यांच्या अती आत्मविश्वासामुळेच पक्षाला फक्त ७५ जागा मिळाल्या असे अधिकारी यांनी सांगितले. (The defeat of the BJP in West Bengal was due to the overconfidence of the BJP leaders)  

हेही वाचा : नवज्योतसिंग सिद्धू जिंकले..बनले पंजाबचे कॅप्टन!

चांदीपूर येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत अधिकारी बोलत होते. यावेळी अधिकारी म्हणाले की ''यांनी अती आत्मविश्वासामुळे मूळ जमिनीवर असणारी परिस्थिती समजून घेता आली नाही. विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांध्ये भाजपने चांगली कामगिरी केली. यानंतर आपल्या काही नेत्यांनी अती आत्मविश्वास वाटू लागला. त्यांना भाजप १७० ते १८० जागा सहज मिळवेल असा विश्वास वाटू लागला. मात्र, यावेळी त्यांनी जमिनीवरील परिस्थिती कोणतीही माहिती घेतली नाही. याचा आपल्याला खूप मोठा फटका बसला, असे अधिकारी यांनी म्हटले आहे.

आपले लक्ष्य पुर्ण करण्यासाठी जमिनीवर काम करणेही तितकेच महत्वाचे आहे. ही सत्य परिस्थिती असून यासाठी कठोर श्रम गरजेचे आहेत असे अधिकारी यांनी सांगितले.

हेही वाचा : स्वबळाची भाषा बोलणारे काँग्रेस नेते मोदी-पवार भेटीमुळे अचंबित! 

अधिकारी यांच्या या वक्तव्यावर तृणमूल काँग्रेसचे कुणाल घोष यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुणाल घोष म्हणाले, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेल्या कल्याणकारी प्रकल्प आणि विकासाच्या कामांचा अधिकारी यांना सोयीस्करपणे विसर पडला आहे. भाजप स्वप्नात जगत आहे, कारण त्यांच्या अनेक नेत्यांनी २०० हून अधिक जागा मिळतील असे म्हटेल होते. ते इतरांमध्ये दोष का शोधत आहेत? सुवेंदू अधिकारी यांनीदेखील १८० जागा मिळातील असे म्हटले होते. खरे तर त्यांनी बंगालची मुख्य नाडी माहिती नाही, जी तृणमूल काँग्रेसला माहिती आहे, अशी टीका कुणाल घोष यांनी केली. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख