रुपानींच्या राजीनाम्यानंतर मुलगी म्हणाली...मोदींच्याही आधी माझे वडील तेथे पोहोचले होते

माझ्या वडिलांचा कार्यकाळ एक कार्यकर्ता म्हणून सुरू झाला आणि अनेक राजकीय पदांद्वारे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले.
Vijay Rupani .jpg
Vijay Rupani .jpg

गांधीनगर : भारतीय जनता पक्षाने (BJP) नुकताच गुरजातमध्ये मोठा फेरबल केला आहे. विजय रुपाणी (Vijay Rupani) यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेतला. त्यानंतर नवीन मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांना नवीन मुख्यमंत्री केले. मात्र, रुपानी यांच्या राजीनाम्याचे मुख्य कारण समोर आले नाही. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यावर विविध अफवा पसरल्या आहेत. त्यावरुन रुपानी यांची मुलगी राधिका यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे टीका करणाऱ्यांना उत्तर दिले आहे. (Daughter Rahika's Facebook post on Vijay Rupani's resignation)  

राधिका यांनी म्हटेल आहे की, २००२ मध्ये अक्षरधाम मंदिरावर हल्ला झाला होता, तेव्हा माझे वडील मोदीजींच्या आधी तिथे पोहोचले होते. 'मुलीच्या दृष्टीकोनातून विजय रूपाणी' असे म्हणत ही फेसबुक पोस्ट केली आहे. तर नुकत्याच झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, चक्रीवादळासारख्या मोठ्या समस्यांमध्ये माझे वडील सकाळी २.३० पर्यंत उठायचे आणि लोकांसाठी व्यवस्था करण्यासाठी फोनवर गुंतलेले असायचे.

माझ्या वडिलांचा कार्यकाळ एक कार्यकर्ता म्हणून सुरू झाला आणि अनेक राजकीय पदांद्वारे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले. मात्र, माझ्या मते, माझ्या वडिलांचा कार्यकाळ १९७९ मध्येधील मोरबी पूर, अमरेलीतील ढगफुटी, कच्छ भूकंप, स्वामीनारायण मंदिर दहशतवादी हल्ला, गोध्रा घटना, बनासकांठा पूर या घटनांपासून सुरु झाला. माझे वडील वादळात आणि कोरोनाच्या काळातही मोठ्या प्रमाणात काम करत होते, असेही राधिका यांनी सांगितले आहे.

पप्पांनी त्यांचे वैयक्तिक काम कधीच पाहिले नाही. त्यांना जी काही जबाबदारी मिळाली ती पूर्ण केली. कच्छ भूकंपाच्या वेळी ते सर्वात आधी तिथे गेले होते. लहानपणीही आई -वडिलांनी फिरायला नेले नाही. चित्रटगृहात नाही तर ते आम्हाला कार्यकर्त्यांच्या घरी घेऊन जात असत. स्वामी नारायण अक्षरधाम मंदिरात दहशतवादी हल्ल्याच्या वेळी तेथे पोहोचणारे पहिले व्यक्ती माझे वडील होते. ते मोदींच्या आधीच मंदिर परिसरात पोहोचले होते.

राजकारण्यांमध्ये संवेदनशीलता नसावी का, नेत्यामध्ये ही आवश्यक गुणवत्ता नाही आहे का, लँड ग्रॅबिंग अॅक्ट, लव्ह जिहाद, गुजरात कंट्रोल ऑफ टेररिझम अँड ऑर्गनाइज्ड क्राइम अॅक्ट (गुजरातसीटीओसी) हे त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे पुरावे आहेत. चेहऱ्यावर गंभीर भाव आणून दाखवणे हे नेते असल्याचे लक्षण आहे का?, असा सवाल त्यांनी केला आहे.

माझे वडील नेहमी सांगतात की भारतीय चित्रपटांमध्ये असलेले राजकारण आणि राजकारण्यांची प्रतिमा आपल्याला बदलावी लागेल. त्यांनी कधीच गटबाजीला समर्थन दिले नाही. हीच त्यांची खासियत होती. काही राजकीय विश्लेषक असा विचार करत असतील विजयभाईंच्या कार्यकाळाचा हा शेवट आहे. मात्र, आमच्या मते दंगली किंवा टीका करण्याऐवजी आरएसएस आणि भाजपच्या तत्त्वानुसार सत्ता सोडणे चांगले आहे, असे राधिका यांनी म्हटले आहे.  

Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com