राहुल गांधींनी शेअर केलेल्या व्हिडिओची सीआरपीएफ सत्यता पडताळणार... - The CRPF will verify the authenticity of the video shared by Rahul Gandhi. | Politics Marathi News - Sarkarnama

राहुल गांधींनी शेअर केलेल्या व्हिडिओची सीआरपीएफ सत्यता पडताळणार...

सरकारनामा ब्युरो
रविवार, 11 ऑक्टोबर 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 8 हजार 400 कोटीं रूपयाचं विमान घेऊन प्रवास करतात. तर आमचं जवान हे नॉन-बुलेट प्रूफ़ वाहनातून प्रवास करीत आहे

नवी दिल्ली  : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लष्करातील जवान विना बुलेट प्रुफ ट्रकमधून प्रवास करत असल्याच्या कारणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी याबाबत टि्वट करीत लष्करी जवान हे विना बुलेट प्रुफ असलेल्या वाहनातून जात असल्याचा व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओची सीआरपीएफकडून सत्यता पडताळून पाहण्यात येत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 8 हजार 400 कोटीं रूपयाचं विमान घेऊन प्रवास करतात. तर आमचं जवान हे नॉन-बुलेट प्रूफ़ वाहनातून प्रवास करीत आहे, हा आमच्या जवानांवरील अन्याय आहे, असं टि्वट राहुल गांधी केलं आहे.  

   
राहुल यांनी या व्हिडिओकडे लक्ष वेधत म्हटले आहे, की देश मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. अशा वेळी पंतप्रधानांनी देशाला या संकटातून बाहेर काढणे गरजेचे आहे. मात्र तसे झाले नाही.राहुल गांधींनी प्रश्‍न केला आहे, की पंतप्रधानांसाठी 8400 कोटी खर्च करून खास विमान खरेदी करण्याची गरज होती का ? आणि आपल्या जवानांना बुटेलट प्रुफ नाहीत. या ट्रकमधून आमच्या जवानांना शहीद होण्यासाठी पाठविले जात आहे. हा कुठला न्याय आहे ? हे मला कळत नाही. 

 

भारत-चीनमधील संघर्षावरून राहुल गांधी मोदींना नेहमीच प्रश्‍न करतात. त्यांनी जाहीरपणे पुढे येऊन माझ्या प्रश्‍नांची उत्तरे दिली पाहिजे तसे नसेल होत तर पत्रकार परिषदेला सामोर जावे. का जात नाहीत पत्रकारांना सामोरे असेही ते बोलून दाखवितात. यापूर्वी त्यांनी ट्विट करून देशातील जवानांना मिळणाऱ्या सुविधाबाबतही प्रश्‍न उपस्थित केला होता.

पंतप्रधान स्वत:साठी 8400 कोटींचे विमान खरेदी करतात त्या पैशात सियाचीन-लडाख सीमेवर तैनात करण्यात आलेल्या आपल्या जवानांसाठी काय काय खरेदी करता आले. जवानांसाठी गरम कपडे, जैकेट, चपला बूट, ऑक्‍सीजन खरेदी करता आला नसता का ?  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख