सिताराम येचुरी यांच्या ३४ वर्षीय पुत्राचा कोरोनाने मृत्यू - cpm leader sitaram yechury son ashish yechury dies due to corona | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई , 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक. दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर अज्ञाताने शेणी पेटवल्या, त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पेटवलेल्या शेणी विझवून तेथून हटविल्या आहेत .

सिताराम येचुरी यांच्या ३४ वर्षीय पुत्राचा कोरोनाने मृत्यू

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 22 एप्रिल 2021

आशिष  यांना दोन दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे आढळले होते.

नवी दिल्ली : मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे (सीपीएम) महासचिव सीताराम येचुरी यांचे ज्येष्ठ चिंरजीव आशिष येचुरी (वय ३४) यांचे आज कोरोनामुळे निधन झाले. आज पहाटे सहा वाजता गुडगावमधील आशिष यचुरी यांनी खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सिताराम यचुरी यांनी टि्वट करीत ही बातमी दिली आहे.  

आशिष  यांना दोन दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे आढळले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी  मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

दोन आठवड्यापूर्वी त्यांना होली हॅास्पीटलमध्ये दाखल करण्यासाठी आले होते. त्यानंतर त्यांना मेंदाता रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. आशिष  हे दिल्ली येथे एका वृत्तपत्रात सिनिअर कॅापी एडिटर म्हणून कार्यरत होते. 

हेही वाचा : कोरोना महामारीतही मोदी सरकारकडून ऑक्सिजनची निर्यात दुप्पट
 
नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत सुमारे 3 लाख नवीन रुग्ण सापडले असून, 2 हजार 23 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात अनेक ठिकाणी रुग्णांचा ऑक्सिजनवाचून तडफडून मृत्यू होत आहेत.  मात्र, देशात कोरोना संकट असतानाही मोदी सरकारकडून ऑक्सिजनची निर्यात दुपटीने झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.  वाणिज्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, मागील आर्थिक वर्ष 2020-21 मधील पहिल्या दहा महिन्यांतील ऑक्सिजनची निर्यात ही त्याआधीच्या संपूर्ण आर्थिक वर्षाच्या तुलनेत दुप्पट आहे. विशेष म्हणजे कोरोना संकटाच्या काळात केंद्र सरकारकडून ऑक्सिजनची निर्यात दुपटीहून अधिक वाढली आहे. एप्रिल 2020 ते जानेवारी 2021 या काळात भारताची ऑक्सिजन निर्यात 9 हजार 301 टन आहे. यातून देशाला 8.9 कोटी रुपये मिळाले आहेत. याउलट आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये देशाची ऑक्सिजन निर्यात 4 हजार 514 कोटी रुपये होती आणि यातून 5.5 कोटी रुपये मिळाले होते.  
 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख