भारतात का झाला कोरोनाचा विस्फोट? WHO च्या सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले कारण...

देशात कोरोनामुळे दररोज जवळपास चार हजार रुग्णांचा मृत्यू होत आहे.
Covid19 variant behind explosion of corona cases in india says soumya swaminathan
Covid19 variant behind explosion of corona cases in india says soumya swaminathan

जिनिव्हा : मागील काही दिवसांपासून भारतात कोरोनाचा (COVID-19) जणू विस्फोट झाला आहे. दररोज चार लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत. तर जवळपास चार हजार रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे जगभरातील अनेक तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. अनेक देशांनी भारताला मदतीचा हात पुढे केला आहे. त्याचबरोबर भारतात कोरोनाचा (India Corona Update) विस्फोट होण्यामागची कारणेही शोधली जात आहेत. (Covid19 variant behind explosion of corona cases in india says soumya swaminathan)

जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) भारतातील कोरोना रुग्णांच्या वाढीवर चिंता व्यक्त केली आहे. तसेच संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी भारतात कोरोनाच्या एका व्हेरिएंटमुळे अधिक संसर्ग वाढल्याचा दावा केला आहे. हा बदल लसीकरणामुळे निर्माण होणारे संरक्षणही रोखू शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

स्वामीनाथन यांनी एका मुलाखतीत सांगितले की, भारतामध्ये विस्फोट होण्यामागे कोरोनाचा B.1.617 हा व्हेरिएंट कारणीभूत आहे. या विषाणुचा संसर्ग खूप वेगाने वाढत चालल्याचे सध्याची स्थितीवरून दिसते. विषाणूचा हा प्रकार मागील वर्षी अॅाक्टोबर महिन्यात पहिल्यांदा आढळून आला होता. कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढण्यामागे अनेक गोष्टी असतात, त्यामध्ये हा विषाणुही एक कारण आहे.

अमेरिका आणि ब्रिटनसारख्या अनेक देश B.1.617 या प्रकाराला गांभीर्याने घेत आहेत. तसेच लवकरच WHO कडूनह आवश्यक पावले टाकले जातील. B.1.617 हा कोरोनाचा प्रकार चिंतेचा विषय आहे. कारण त्यामध्ये जे बदल होत आहेत, ते संसर्ग वाढवत आहेत. तसेच लस आणि संसर्गानंतर वाढणाऱ्या रोगप्रतिकार शक्तीला हे विषाणू रोखू शकतात, अशी भीतीही स्वामीनाथन यांनी व्यक्त केली आहे.

निष्काळजीपणाही कारणीभूत

भारतात कोरोनाचा विस्फोट होण्यामागे केवळ कोरोना विषाणुमधील बदल कारणीभूत नाहीत. तर लोकांमधील निष्काळजीपणाही तेवढाच जबाबदार आहे. लोकांनी कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांना फारसे गांभीर्याने घेतले नाही. भारतात अनेक लोकांना वाटले की, संकट संपले. त्यामुळे लोकांनी मास्क लावणे आणि इतर नियमांचे पालन करणे सोडले, असेही स्वामीनाथन यांनी स्पष्ट केले. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com