अमेरिकेला 'कोव्हॅक्सिन'ची अॅलर्जी : लस घेतलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठांचे दरवाजे बंद

अमेरिकेतील विद्यापीठांच्या भूमिकेमुळे भारतीय विद्यार्थ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.
Covaxin and Sputnik V are not allowed in American Universities
Covaxin and Sputnik V are not allowed in American Universities

वॅाशिंग्टन : कोरोनाचा (Covid-19) संसर्ग रोखण्यासाठी जगभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर दिला जात आहे. सध्या जगभरात अनेक लशी उपलब्ध असून त्याचा वापर वेगाने केला जात आहे. भारतात कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लशीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. तर काही दिवसांपासून स्पुटनिक व्ही ही लस दिली जात आहे. अनेक देशांनी प्रवासासाठी लसीकरण बंधनकारक केले आहे. (Covaxin and Sputnik V are not allowed in American Universities )

परदेशात शिक्षणासाठी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाही लसीकरण आवश्यक आहे. पण अमेरिकेतील विद्यापीठांच्या भूमिकेमुळे भारतीय विद्यार्थ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. कोव्हॅक्सिन किंवा स्पुटनिक व्ही या लशी घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा दुसरी लस घेण्याचे बंधन घालण्यात आले आहे. या दोन्ही लशींना जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) अद्याप मान्यता दिलेली नाही. त्यामुळे विद्यापीठांनी WHO ची मान्यता असलेली अन्य कोणतीही लस पुन्हा घेण्यास सांगितले आहे. 

दोन्ही लशींची सुरक्षितता व परिणामकारकेतबाबत अधिकृतपणे योग्य माहिती नसल्याने विद्यापीठांनी हा निर्णय घेतल्याचे समजते. त्यामुळे या लशी घेतलेल्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी इतर लस घेणे आवश्यक असल्याचे विद्यापीठांनी म्हटलं आहे. त्यामुळं भारतीय विद्यार्थ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहे. भारतात कोव्हॅक्सिन लस घेतल्यांची संख्या काही कोटींच्या घरात आहे. ता. 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना ही लस देण्यास सुरूवात झाली आहे.

न्युयॅार्क टाईम्समध्ये हे वृत्त प्रसिध्द झाले आहे. कोलंबिया विद्यापीठातील स्कुल ऑऱ इंटरनॅशनल अॅन्ड पब्लिक अॅफेअर्समध्ये प्रवेश मिळालेल्या एका 25 वर्षीय विद्यार्थीनीने या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. ती म्हणाली, भारतामध्ये मी यापूर्वीच कोव्हॅक्सिन लशीचे दोन डोस घेतले आहेत. आता विद्यापीठाने विद्यापीठात येण्यापूर्वी दुसरी लस घेण्यास सांगितले आहे. आता पून्हा वेगळी लस घेण्याची भीती वाटत आहे.

अमेरिकेतील सेंटर फॅार डिसिज कंट्रोल अॅन्ड प्रिव्हेन्शन (CDC) चे प्रवक्ते क्रिस्टन नॅार्डलुंड यांनीही दोन वेगळ्या लशींची सुरक्षितता आणि परिणामकारकेतबाबत अद्याप अभ्यास झाला नसल्याचे सांगितले. WHO ची मान्यता नसलेली लस घेतलेल्यांना इतर लस घेण्यापूर्वी 28 दिवस थांबावे लागले. त्यानंतरच इतर लशीचा पहिला डोस घेता येईल. अमेरिकेमध्ये सध्या WHO ची मान्यता असलेल्या फायझर, मॅाडर्ना आणि जॅान्सन अॅन्ड जॅान्सन या लशी उपल्ध आहे. 

भारतातून दरवर्षी दोन लाख विद्यार्थी

भारतातून दरवर्षी अमेरिकेत दोन लाखांहून विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी जातात. सध्या अनेकांना तेथील विद्यापीठांनी मान्यता दिलेल्या लस घेण्यासाठी नोंदणी करणेही अडचणीचे होत आहे. तेथील लस घेतल्याशिवाय विद्यापीठ कॅम्पसमध्ये प्रवेश मिळणार नाही. त्यामुळं विद्यार्थ्यांना शैक्षणिक भवितव्याची काळजी लागून राहिली आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com