आपणे राहुलजी को मारा है, देश आप को माफ नही करेंगा ! - The country will not forgive you on whose orders Rahul Gandhi was beaten up! | Politics Marathi News - Sarkarnama

आपणे राहुलजी को मारा है, देश आप को माफ नही करेंगा !

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020

हाथरसमध्ये जाण्याचा प्रयत्न राहुल यांनी केला असतापोलिसांबरोबर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी वाद घातला.

हाथरस/कोलकत्ता : "" कधी अल्पसंख्याकांचा छळ, कधी दलितांचा छळ आणि काही वेळा आदिवासींचा छळ ! या कोणत्या प्रकारचा नियम असा संतप्त सवाल पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि योगी सरकारला केला आहे. 

आपणे राहुलजी को मारा है, देश आप को माफ नही करेंगा ! किसके इशारे पे आपणे लाठीचार्ज किया ! असा सवाल संतप्त सवाल कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी हाथरसमध्ये पोलिस अधिकाऱ्यांना केला आहे. 

हाथरसमध्ये एका दलित युवतीवर बलात्कार होता. तिची हत्या झाली आहे. या युवतीवर केवळ बलात्कार झाला नाही तर तिचा मृतदेह जळाला होता. याचा यूपी पोलिसांना तपास केला पाहिजे अशी मागणी करतानाच देशातील अल्पसंख्याक, आदिवसी, दलितांना लक्ष्य केले जात असल्याबद्दल त्यांनी भिती व्यक्त केली आहे. हाथरसच्या घटनेनंतर देशातील प्रत्येकाचे मन सुन्न झाले आहे. कॉंग्रेस, समाजवादी पक्ष, बसपसह देशभरातील सर्वच पक्ष आणि संघटनांनी या घटनेचा निषेध व्यक्त करतानाच नराधमांना कठोर शासन झाले पाहिजे अशी मागणी केली आहे. महाराष्ट्रातून शिवसेनेनेही तिच मागणी केली आहे. 

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी हे तर आज हाथरसकडे रवाना झाले पण, पोलिसांना त्यांनी अडविले आहे. हाथरसमध्ये त्यांना जावू दिले नाही. राहुल गांधी यांना तर पोलिसांनी अटकच केली आहे. हाथरसमध्ये जाण्याचा प्रयत्न राहुल यांनी केला असतान पोलिसांबरोबर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी वाद घातला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीमार केल्याचा आरोप केला आहे. ज्यावेळी पोलिस राहुल यांच्याशी चर्चा करीत होते, तेव्हा कॉंग्रेसचा कार्यकर्ते म्हणाले, की तुम्ही कोणाच्या आदेशावरून राहुल गांधीवर दंडुका उचललात. देश तुम्हाला माफ करणार नाही हे लक्षात ठेवा. 

हाथरसला मला एकट्याला चालत जायचे आहे. मला जावू द्या! तुम्ही मला एक सांगा की कोणत्या कायद्याखाली अटक करीत आहे.'' असे राहुल गांध यांनी पोलिसांना विचारले त्यावर त्यावर पोलीस म्हणाले, "" आम्ही तुम्हाला कलम188 आपीसी अंतर्गत अटक करीत आहोत. कारण आपण कायद्याचे उल्लंघण करीत आहात. पोलिसांना राहुल हे विनंती करीत होते की मला एकट्याला जावू द्या कारण मला हाथरसमधील पिडित मुलीच्या आईवडीलांची भेट घ्यायची आहे पण, पोलिसांनी त्यांना तेथे जाण्यास परवानगी दिली नाहीत त्यांना अटक करण्यात आली आहे. कोरोना कायद्याचे उल्लंघन केल्याचे कारण त्यांना देण्यात आले. 

नोअडाचे एडीसीपी रणविजय सिंह यांनी सांगितले, की राहुल गांधींची गाडी पोलिसांनी थांबवली. त्यानंतर राहुल गाडीतून उतरत पोलिसांना म्हणाले, की मला एकट्याला हाथरसला जावू. मी चालत जातो. तरीही पोलिसांनी त्यांना परवानगी दिली नाही. कलम 188 अंतर्गत त्यांना अटक करण्यात आली आहे. 
पोलिसांनी आपल्याला हाथरसकडे जावू दिले नाहीत तसेच पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

हाथरस घटनेनंतर योगी सरकारने हाथरस परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढविला असून कोणालाही तेथे सोडण्यात येत नाही. या घटनेमुळे राज्यात संतापाची लाट आहे. राहुल गांधींना पोलिसांनी अटक केली आहे. राहुल यांच्याप्रमाणे प्रियंका गांधीही हाथरसकडे रवाना झाल्या आहेत त्यांच्या गाड्याही युमना हायवेवर रोखण्यात आल्या आहेत. 

दरम्यान, समाजवादी पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी या घटनेच्या निषेधार्थ हाथरसमध्ये आंदोलन केले. सर्वच पक्ष आणि संघटनांची एकच मागणी आहे, नराधमांना फासावर लटकवा तरच पिडित युवतील न्याय मिळेल. 

तसेच राष्ट्रीय महिला आयोगाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून यूपी पोलिसांनी तातडीने स्पष्टीकरण देण्याच्या सूचना केल्या आहेत.आहे त्याबाबत तातडीने स्पष्टीकरण द्यावे.  

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख