पहिल्या टप्प्यातच करोना लस मोफत..आरोग्यमंत्र्यांचा युटर्न.. - Corona vaccine free only in the first stage Health Minister Harshvardhan  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
सरपंचपदाचे आरक्षण नव्यानेच होणार आणि प्रशासकांच्या कारभाराची चौकशीही होणार

पहिल्या टप्प्यातच करोना लस मोफत..आरोग्यमंत्र्यांचा युटर्न..

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 2 जानेवारी 2021

पहिल्या टप्प्यातच ही लस मोफत देणार असल्याचे आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी स्पष्ट केलं आहे.  

नवी दिल्ली : कोरोना लसीकरणाचा ड्राय रन देशभर आज होत आहे. संपूर्ण देशात कोरोनाची लस मोफत मिळणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली होती. पण काही क्षणातच त्यांनी युटर्न घेत पहिल्या टप्प्यातच करोना लस मोफत दिली जाणार असल्याचं सांगत त्यांनी त्या घोषणेबद्दल खुलासा केला आहे.

देशभरात आजापासून ड्राय रन केलं जात आहे. आज केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी ड्राय रनचा आढावा घेतला. यावेळी डॉ. हर्षवर्धन यांनी करोना लसीसंदर्भात महत्त्वाची घोषणा केली होती. मात्र, काही वेळातच त्यांनी सगळ्यांना मोफत लस दिली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. 

कोरोना लसीसाठी नागरिकांना पैसे द्यावे लागतील की, दिल्लीप्रमाणे मोफत दिली जाणार आहे ? असा प्रश्न पत्रकारांनी हर्षवर्धन यांना विचारण्यात होता. या प्रश्नाला उत्तर देतांना त्यांनी सांगितले की फक्त दिल्लीतच नाही, तर संपूर्ण देशात करोना लस मोफत दिली जाणार आहे. या घोषणेचे स्वागत होत असतानाच त्यांनी काही वेळातच पुन्हा याबाबत खुलासा करून पहिल्या टप्प्यातच ही लस मोफत देणार असल्याचे स्पष्ट केलं आहे.  

ड्राय रनसाठी महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज याबाबत घेतलेल्या व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लसीकरणासाठी कशाप्रकारे तयारी करायची याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

ड्राय रनसाठी एकाच जिल्ह्यातील तीन साईट (आरोग्य केंद्र) निवडण्यात आले आहेत. लसीकरणाच्या या ड्राय रनमध्ये निवडण्यात आलेल्या तीनही ठिकाणच्या प्रत्येकी २५ जणांना लसीकरणासाठी निवडण्यात येणार आहे. मात्र प्रत्यक्षात लस टोचण्यात येणार नाही. मात्र त्यासाठी ज्या मार्गदर्शक सूचना आहेत, त्याप्रमाणे सर्व तयारी केली जाणार आहे. लसीकरणाच्या ठिकाणी वीज, इंटरनेट, सुरक्षा यासोबत प्रतिक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष असे तीन कक्ष केले जातील. 

महाराष्ट्रातील पुणे येथील जिल्हा रुग्णालय औंध, प्राथमिक आरोग्य केंद्र मान, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील जिजामाता रुग्णालय, नागपूर जिल्ह्यातील डागा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय कामटी, नागपूर महापालिकेचे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, जालना येथील जिल्हा रुग्णालय जालना, उप जिल्हा रुग्णालय अंबड, बदनापूर तालुक्यातील शेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नंदूरबार येथील जिल्हा रुग्णालय नंदूरबार, प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टे आणि नवापूर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी लसीकरणाचा ड्राय रन होणार आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख