मोठी बातमी : 45 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस मिळणार... - corona vaccine everyone over the age of 45 will get the corona vaccine | Politics Marathi News - Sarkarnama

मोठी बातमी : 45 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस मिळणार...

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 23 मार्च 2021

येत्या 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांनी कोरोना लस देण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : देशभरात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ता. 16 जानेवारीपासून देशात लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला आहे. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येत आहे. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांनाही लस दिली जात आहे. 

कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता 45 वर्षावरील सर्वांनी ही लस देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती. ''येत्या 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांनी कोरोना लस देण्यात येईल,'' अशी महत्वपूर्ण घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. कोव्हिशिल्ड लशीचा दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा महत्वाचा निर्णय काल केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारने आता हा कालावधी 6 ते 8 आठवडे केला आहे. याबाबत केंद्राने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सूचना दिल्या आहेत. 

कोरोना लशीच्या दोन डोसमध्ये सध्या चार आठवड्यांचे अंतर आहे. म्हणजेच लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर चार आठवड्यांनी दुसरा डोस घ्यावा लागतो. कोव्हिशिल्ड ही लस ऑक्सफोर्ड आणि अॅस्ट्राझेनेका यांनी विकसित केली असून, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया तिचे उत्पादन करीत आहे. कोव्हॅक्सिन या लशीच्या दोन डोसमधील अंतर बदलण्यात आले नसून, ते चार आठवडेच राहील, असेही सरकारने स्पष्ट केले आहे. लशीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येत आहे. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांनाही लस दिली जात आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत देण्यात येत आहे. मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी 250 रुपये मोजावे लागत आहेत. सरकारने ही किंमत दोनशे रुपयांवर आणली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोना गेल्याचा समज, सार्वजनिक ठिकाणी होणार गर्दी, नागरिकांचा बेजबाबदारपणा यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत कोरोनाचा सामना करण्यासाठी पुढची रणनीती आखली जाऊ शकते. पुणे, नाशिक, मुंबई येथे रूग्णांच्या वाढता आकडा लक्षात या ठिकाणी लाँकडाउनची शक्यता नाकारता येते नाही. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कालच राज्यातील लाँकडाउनबाबतचे संकेत दिले आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढत असतील तर काही शहरांमध्ये लॉकडाऊन करावा लागेल. या आज मुद्द्यावर आरोग्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. राज्यात कडक निर्बंध लावायचे किंवा लॉकडाउनचा निर्णय याबाबत चर्चा होऊ शकते. लॉकडाऊन टाळायचे असेल तर कोरोनासंबंधीच्या नियमांचे पालन नागरिकांना करावे लागेल

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख