पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांसह शाहीद आफ्रिदीला कोरोना

पाकिस्तानात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनाही आज कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. तत्पूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदी याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याने स्वतः आज ट्विट करून ही माहिती दिली.
Corona to Shahid Afridi along with former Prime Minister of Pakistan
Corona to Shahid Afridi along with former Prime Minister of Pakistan

नवी दिल्ली : पाकिस्तानात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनाही आज कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. तत्पूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदी याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याने स्वतः आज ट्विट करून ही माहिती दिली. 

युसूफ रझा गिलानी यांच्या अगोदर माजी पंतप्रधान आणि "पीएमएल-एन'चे नेते शाहीद खाकाना अब्बासी यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले होते. कोरोनाचा पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर ते तातडीने होम क्वारंटाइन झाले आहेत. 

पाकिस्तानमध्ये अनेक नेत्यांना कोरोनाची बाधा झाला आहे. त्यात केंद्रीय मंत्री शहरयार आफ्रिदी, "पीएमएल-एन'चे खासदार नावेद अली, पीपीई नेते शरजील मेमन हे कोरोना विषाणूने संक्रमित झाले आहेत. याशिवाय "पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ'चे चौधरी अली अख्तर यांनाही कोरोना झाला आहे. 

शाहीद आफ्रिदी आणि युसूफ रझा गिलानी यांचे कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आजच (ता. 13) आले आहेत. आफ्रिदीने स्वतःच ही माहिती ट्‌विटद्वारे दिली आहे. पाकिस्तानात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून आफ्रिदी हा गरजू आणि गरिबांना मदत करत होता. आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने तो पाकिस्तानातील वेगवेगळ्या भागात मदत पोचवित होता. 

युसूफ रझा गिलानी यांनी 25 मार्च 2008 रोजी पाकिस्तानचे 18 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना 2012 मध्ये विविध आरोपांमुळे पंतप्रधान पदावरून पायउतार होण्यास सांगितले होते, त्यामुळे त्यांना कालावधी पूर्ण होण्याआधीच 26 एप्रिल 2012 रोजी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. 

कोरोनावरील लस वर्षाच्या अखेरपर्यंत येणार 

वॉशिंग्टन : जगभरात कोरोनाने थैमान घातले असून, आतापर्यंत 77 लाख 58 हजार जणांना संसर्ग झालेला असून, 4 लाख 28 हजार 633 जणांचा मृत्यू झाला आहे. भारताचा विचार करता एकूण रुग्णसंख्येत भारताने जगात तिसरा क्रमांक गाठला आहे. कोरोना महामारीला रोखण्यात अपयश येत असल्याच्या पार्श्वभूमीवर एक चांगली बातमी आली आहे. कोरोनावरील लस तयार करण्यात अमेरिकेने आघाडी घेतली असून, जुलै महिन्यात या लसीच्या चाचण्यांना सुरुवात होणार आहे. 

अमेरिकेतील "नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ' (एनआयएच) आणि मॉडर्ना कंपनी यांनी कोरोनावरील लस तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या लसीची चाचणी 30 हजार स्वयंसेवकांवर घेण्यात येणार आहे. यातील काही जणांना प्रत्यक्ष लस देण्यात येईल, तर काहींना अप्रत्यक्ष स्वरूपात लस देण्यात येईल. आधीच्या टप्प्यात कमी प्रमाणात दिलेल्या औषधाचा परिणाम ही लस टोचण्यापूर्वी जाणून घेतला जाणार आहे. आतापर्यंत झालेला अभ्यास हा पुढील टप्प्यातील संशोधनासाठी पुरेसा आहे, असेही मॉर्डना कंपनीने म्हटले आहे. 

मॉडर्नाने सुरुवातीला मार्च महिन्यात 45 स्वयंसेवकांवर लसीची चाचणी केली. दुसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी 300 तरुणांची नोंदणी करण्यात आली आहे. सुरुवातीला लसीचे दुष्परिणाम आणि वेगवेगळ्या मात्रांना लोकांची रोगप्रतिकारशक्ती कसा प्रतिसाद देते, याची चाचणी करण्यात आली. मोठ्या प्रमाणावर चाचण्या झाल्यानंतर लसीसी परिणामकारकता सिद्ध होऊ शकेल. या लसीचा ज्येष्ठांवर होणारा परिणामही अभ्यासण्यात येत आहे. आता शेवटच्या टप्प्यातील चाचणीत यश मिळाले लसीकरणाला सुरवात करण्यात येणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com