कोरोना रुग्णानो, धुम्रपान आणि दारूपासून दूर राहा, आरोग्य मंत्रालयाचे आवाहन  - Corona Rugano, stay away from smoking and alcohol, appeals the Ministry of Health | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोना रुग्णानो, धुम्रपान आणि दारूपासून दूर राहा, आरोग्य मंत्रालयाचे आवाहन 

वृत्तसंस्था
रविवार, 13 सप्टेंबर 2020

आयुष मंत्रालयाने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी औषधांचे सेवन करण्याचाही सल्ला दिला आहे.

नवी दिल्ली :कारोना रुग्णांनो तुम्ही बरे झाला असाल तर घरी किंवा ऑफिसमध्ये टप्प्याटप्प्याने काम सुरू आणि हो, धुम्रपान आणि अल्कोहोलपासून दूर राहा असे आवाहन आरोग्य मंत्रालय आणि आयुष मंत्रालयाने देशातील नागरिकांना केले आहे. 

देशात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता आरोग्य मंत्रालयाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.कोरोनाबाधित आणि कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांसाठी देखील मंत्रालयाने काही टिप्स दिल्या आहेत. 

योगासनापासून ते काढा घेण्यापर्यतच्या सूचनांचा यात समावेश आहे.याशिवाय नियमित प्राणायाम करणे, च्यवनप्राशचे सेवन करण्याचा सल्ला दिला आहे. माक्‍सशिवाय घराबाहेर पडू नये, गर्दीत जाणे टाळणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. 

देशात कोरोना संसर्गाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. सध्या देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा लाखांचवर गेला आहे. अर्थात बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. यादरम्यान आरोग्य मंत्रालयाने कोरोनासंदर्भात नवीन प्रोटोकॉल जारी केला आहे.

या मार्गदर्शक सूचनांत कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांनी कोणती पथ्य पाळावीत तसेच काय करावे आणि काय करु नये, याचा समावेश केला आहे. आरोग्य मंत्रालयाने नारिकांना पुरेशा प्रमाणात गरम पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे.

तसेच आयुष मंत्रालयाने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी औषधांचे सेवन करण्याचाही सल्ला दिला आहे. या प्रोटोकॉलमध्ये स्वत:च्या प्रकृतीकडे लक्ष देण्यासही सांगितले आहे. घरातील तापमान, रक्तदाब, मधुमेह असणाऱ्यांनी साखरेची पातळी तपासावी, अशीही सूचना दिली आहे.

याशिवाय डॉक्‍टरच्या सल्ल्यानुसार पल्स ऑक्‍सिमेट्रीचा वापर करणे गरजेचे आहे. तत्पूर्वी आरोग्य मंत्रालयाने खासगी रुग्णालयाला देखील सूचना केल्या आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करु नये, असे सांगितले आहे. 

सकाळी आणि रात्री गरम पाणी घेणे, आयुष मंत्रालयाच्या इम्युनिटी बुस्टिंगच्या औषधांचे सेवन, मुळेथी पावडर, आयुष क्वथ, समशमनी वटी, अश्‍वगंधा या औषधांचा समावेश, सकाळी गरम दूध किंवा पाण्याबरोबर एक चमचा च्यवनप्राशचे सेवन ,दररोज सकाळी आणि सायंकाळी हळद टाकून दूध पिणे, संतुलित भोजन आणि पुरेशी झोप घेणे, घरी किंवा ऑफिसमध्ये टप्प्याटप्प्याने काम सुरू करणे, धुम्रपान आणि अल्कोहोलपासून दूर राहणे हळद आणि मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करा आदी सूचनाही सरकारने केल्या आहेत 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख