केंद्र सरकार म्हणतेय, देशात कोरोनाची तिसरी लाट येणारच पण... - Corona phase three is inevitable says governments scientific advisor | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

केंद्र सरकार म्हणतेय, देशात कोरोनाची तिसरी लाट येणारच पण...

वृत्तसंस्था
बुधवार, 5 मे 2021

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. जुलै महिन्यानंतर तिसरी लाट येईल, अशी शक्यता काही तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अत्यंत घातक असल्याचे सद्यस्थितीवरून दिसत आहे. रुग्णांना बेड, अॅाक्सीजन (Oxygen Shortage) मिळणेही कठीण झाले आहे. त्यातच देशात आता तिसऱ्या लाटेची (Third wave) चर्चा सुरू झाली आहे. ही लाटही अधिक तीव्र येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पण ही लाट कधी येणार, हे सांगता येणार नसल्याचे केंद्र सरकारनेच म्हटले आहे.

देशात जुलै महिन्यानंतर तिसरी लाट येईल, अशी शक्यता काही तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. पण केंद्र सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी तिसरी लाट कधी येणार, हे स्पष्टपणे सांगता येणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, सध्या ज्या वेगाने विषाणुचा संसर्ग होत आहे, हे पाहता कोरोनाची तिसरी लाट अपरिहार्य आहे. पण ही लाट कधी येईल, हे स्पष्ट नाही. आपल्याला नवीन लाटेसाठी सज्ज राहावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा : मराठा आरक्षणाचा असा झाला प्रवास...व्ही. पी. सिंह ते उद्धव ठाकरे

देशात 24 तासांत 3 हजार 780 जणांचा मृत्यू 

देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 6 लाख 65 हजार 148 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 26 हजार 188 झाली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 3 लाख 82 हजार 315 रुग्ण सापडले आहेत.  मागील 24 तासांत 3 हजार 780 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 34 लाखांवर गेली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या वाढल्याने देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला आहे. यामुळे रुग्णांसाठी रुग्णालये अपुरी पडू लागल्याचे चित्र आहे. देशातील कोरोनाची रुग्णसंख्या दररोज वेगाने वाढत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 34 लाख 87 हजार 229 असून, एकूण बाधितांमध्ये याचे प्रमाण 16.87 टक्के आहे. देशात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 82.03 टक्के आहे. देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 69 लाख 51 हजार 731 आहे. याचवेळी मृत्यूदर 1.09 टक्के आहे. 

देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढीचे टप्पे 

20 लाख : 7 ऑगस्ट  (2020) 
30 लाख : 23 ऑगस्ट  
40 लाख : 5 सप्टेंबर  
50 लाख : 16 सप्टेंबर 
60 लाख : 28 सप्टेंबर 
70 लाख : 11 ऑक्टोबर  
80 लाख : 29 ऑक्टोबर  
90 लाख : 20 नोव्हेंबर 
1 कोटी : 19 डिसेंबर 
1.5 कोटी : 19 एप्रिल (2021)  
2 कोटी : 4 मे 

Edited By Rajanand More
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख