राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना कोरोनाची लागण  - Corona to former Rajasthan Deputy Chief Minister Sachin Pilot | Politics Marathi News - Sarkarnama

राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना कोरोनाची लागण 

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

येत्या काही दिवसांतच मी कोरोनावर मात करेन आणि जनसेवेत पुन्हा परतेन.

जयपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री तथा कॉंग्रेस पक्षाचे नेते सचिन पायलट यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांना स्वत :  याबाबतची माहिती ट्‌विट करून दिली आहे. 

ट्‌विटमध्ये पायलट यांनी म्हटले आहे की माझी कोविड-19 ची चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात जे जे लोक आले आहेत, त्यांनी आपली कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही पायलट यांनी केले आहे. 

ते पुढे म्हणतात की माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर मी सध्या डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत आहे. येत्या काही दिवसांतच मी कोरोनावर मात करेन आणि जनसेवेत पुन्हा परतेन, असा विश्‍वासही कॉंग्रेस पक्षाचे आमदार असलेले सचिन पायलट यांनी व्यक्त केला आहे. 

दरम्यान, यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक खासदार आणि मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख