रविना टंडनच्या टि्वटवरून पोलिस आयुक्तांचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल.. 

रविना टंडनच्या बनावट अकाउंटमधून मुंबई पोलिस आणि मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची बदनामी करणारी पोस्ट शेअर करण्यात आली होती.
रविना1.jpg
रविना1.jpg

मुंबई : अभिनेत्री रविना टंडन हिच्या नावाने बनावट टि्वटर अकाउंट उघडल्या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविना टंडनच्या बनावट अकाउंटमधून मुंबई पोलिस आणि मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची बदनामी करणारी पोस्ट शेअर करण्यात आली होती. 

मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या छायाचित्रात फेरफार करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न या बनावट टि्वट अकाउंटवरून करण्यात आला होता. याबाबत रविना टंडनने मुंबई पोलिसाच्या सायबर सेलकडे याबाबत तक्रार दिली आहे.  

रविना टंडन हिच्या नावावर बनावट टि्वटर अकाउंटवरून आरोपींना मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या एक व्हिडिओ तयार केला होता. त्यासोबत अपमानजनक मजकूर पोस्ट केला होता. तसेच आरोपींनी मराठी भाषा आणि मराठी बोलणाऱ्या व्यक्तीबाबत अपमानजनक मजकूर शेअर केला होता. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात विविध कलमांच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे टि्वट अकाउंट ब्लॅाक करण्यात आले आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांने नाव न सांगण्याच्या अटींवर दिली आहे. 


हेही वाचा : अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांनी शिवसेनेला होकार कळविला ! 
मुंबई : आपण आमदार होण्यास तयार आहोत असा होकार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेला कळविला असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी मातोंडकर यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूकही लढविली होती. त्यांचा पराभव झाला. मात्र त्यानंतर त्या पक्षात सक्रिय राहिल्या नाहीत. त्या राजकारणापासून दूर राहिल्या. सुशांतसिंह प्रकरणानंतर त्या पुन्हा चर्चेत आल्या. अभिनेत्री कंगना राणावत हिने बॉलिवूड आणि मुंबईविषयी जी काही मुक्ताफळे उधळली होती त्याला मातोंडकर यांनी जशास तसे उत्तर देऊन आपला मराठीबाणा दाखविला होता. राज्यपाल नामनिर्देशित विधानपरिषदेच्या रिक्त जागांपैकी एका जागेवर मातोंडकर यांच्या नावाची शिवसेनेकडून शिफारस करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोंडकर यांच्याशी फोनवरुन चर्चा केली होती. इंडियन एक्‍प्रेसशी बोलताना संजय राऊत यांनी मोतोंडकर यांनी आमदार होण्यास होकार दिल्याची माहिती दिली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com