नरेंद्र मोदींना बॅाम्बनं उडविण्यासाठी कोणी धमकी का देत नाही..? माजी आमदाराचा प्रश्न - Controversial statement about Narendra Modi once again | Politics Marathi News - Sarkarnama

नरेंद्र मोदींना बॅाम्बनं उडविण्यासाठी कोणी धमकी का देत नाही..? माजी आमदाराचा प्रश्न

सरकारनामा ब्युरो
रविवार, 4 ऑक्टोबर 2020

एका माजी आमदारानं नरेंद्र मोदींना बॅाम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. मध्यप्रदेश येथील सिवनी येथे एका माजी आमदारानं नरेंद्र मोदींना बॅाम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे. कुडारी गावात एका आदिवासी समुहाच्या सभेत त्यांनी हे वादग्रस्त व्यक्तव्य केलं आहे. 

आदिवासींचे नेते व ‘गोंडवाना गणतंत्र पार्टी’चे माजी आमदार रामगुलाम उइके यांनी हे व्यक्तव्य केलं आहे. रामगुलाम उड्के म्हणाले की माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची गोळी मारून हत्या करण्यात आली. तर राजीव गांधी यांना बॅाम्बनं उडविण्यात आलं आहे. नरेंद्र मोदी यांच्यासाठी कोणी बॅाम्ब का नाही बनवत..त्यांना बॅाम्बनं उडविण्याची धमकी का देत नाही. 

त्याचे मोदी बाबत हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं त्यांच्यावर नेटकऱ्यांनी टीका केली आहे. त्याचे हे वक्तव्य तीन दिवसापूर्वीचं आहे. याबाबत अजून भाजपच्या नेत्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. रामगुलाम उइके हे घंसौर विधानसभा मतदार संघातून निवडणून आले होते. ‘गोंडवाना गणतंत्र पार्टी’ च्या तिकीटावर ते 55 हजार 389 मतांनी निवडून आले होते. त्यांनी काँग्रेसच्या उर्मिला देवी यांचा पराभव केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यापूर्वीही सोशल मीडियावरून वादग्रस्त आणि धमकी देणारे व्यक्तव्ये काही जणांनी केली आहेत. 

हेही वाचा : हाथरस खटला उत्तरप्रदेशच्या बाहेर चालवावा..
अमरावती : सध्या देशभरात उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणावरून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. शिवाय, उत्तरप्रदेश सरकारवर यावरून सर्वस्तरातून टीका होत आहे. हाथरस येथे घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाचा खटला हा उत्तरप्रदेश मध्ये न चालवता तो बाहेरच्या राज्यात चालवावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँगेसच्या उपाध्यक्षा व राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री अॅड यशोमती ठाकूर यांनी आज केली. सुप्रीम कोर्टाने राजधर्माचे पालन या ठिकाणी करायला पाहिजे, असेही त्या यावेळी म्हणाल्या. ज्या ठिकाणी हि घटना घडली त्या ठिकाणचे पुरावे नष्ट होऊ शकतात तर पीडित परिवाराचे सदस्य हि जिवंत राहिले पाहिजे असे हि महिला व बाल कल्याण मंत्री अॅड. यशोमती ठाकूर म्हणाल्या. त्या तरुणीच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेशमधील वातावरण चांगलेच तापले आहे. आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, पीडितेच्या आईनंदेखील आपली व्यथा मांडली आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख