काँग्रेस नेत्याला मोदींची स्तुती भोवली; कार्यकर्त्यांनी जाळला पुतळा

पक्षाला मदत करण्याची गरज असताना ते भाजपशी मैत्री करू पाहत असल्याची टीका कार्यकर्त्यांनी केली आहे.
Congress workers raise slogans against Ghulam Nabi Azad in jammu
Congress workers raise slogans against Ghulam Nabi Azad in jammu

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांना राज्यसभेतून निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले होते. यावेळी पंतप्रधानांनी आझाद यांचे तोंडभरून कौतुकही केले होते. तर आझाद यांनी नुकतेच एका कार्यक्रमात मोदींचे कौतुक करत त्यांच्यांकडून काही शिकायला हवे, असे म्हटले होते. त्यावरून आता वाद निर्माण झाला आहे. 

काँग्रेसचे जम्मु काश्मीरमधील कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज कार्यकर्त्यांनी आझाद यांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन केले. आझाद यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनही केले. काँग्रेसने त्यांना अनेक उच्च पदे दिली. पण आज पक्षाला मदत करण्याची गरज असताना ते भाजपशी मैत्री करू पाहत आहेत. ते जम्मुमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये प्रचारासाठी आले नाहीत. आता ते इथे येऊन मोदींचे कौतुक करत आहेत, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. 

काँग्रेसच्या नेतृत्वात बदल करण्यासोबत पक्ष संघटनेची फेररचना करावी, अशी मागणी करणारे पत्र 23 ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिले होते. यावरुन मोठा गदारोळ उडाला होता. या नेत्यांनी उघडपणे बंडाची भाषा केल्याची टीका पक्षातूनच त्यांच्यावर करण्यात आली होती. या नेत्यांमध्ये गुलाम नबी आझाद यांचाही समावेश आहे. 

देशांतील पाच राज्यांत विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. त्यानंतर या नेत्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये शांती संमेलन घेत पक्षातील विविध धोरणांवर उघडपणे टीका केली. या संमेलनात गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसने संसदेतून मुक्त केल्याबद्दल अनेक नेत्यांनी जाहीरपणे दु:ख व्यक्त केले. या वेळी बोलताना सिब्बल यांच्यासह अन्य काही नेत्यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला. पक्ष दुबळा होत चालल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. 

त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आझाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. एका कार्यक्रमात बोलताना आझाद म्हणाले, नरेंद्र मोदी स्वत:ला गर्वाने चहावाला संबोधतात. माझ नरेंद्र मोदी यांच्यासोबत राजकीय मतभेद आहेत. पण पंतप्रधानाचे पाय जमिनीवर आहेत. आपल्या विनम्रता आणि लोकांना विसरून चालणार नाही. पंतप्रधान बनूनही मोदी आपले मूळ विसरलेले नाहीत. लोकांना त्यांच्याकडून हे शिकायला हवे, असा सल्लाही त्यांनी दिला.  

दरम्यान, आझाद यांना संसदेतून निरोप देताना पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले होते. त्यांच्याविषयी बोलताना मोदी भावुकही झाले. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com