काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे अश्रू आले कामी; भाजपपेक्षा जास्त जागा मिळवण्यात यश

कमी जागा देऊन अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला होता.
Congress will contest in 25 assembly seats in tamil nadu
Congress will contest in 25 assembly seats in tamil nadu

चेन्नई : तमिळनाडूतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि द्रमुकमध्ये जागा वाटपावरुन सुरू असलेला वाद आता मिटला आहे. कमी जागा देऊन द्रमुक अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप करत काल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष के.एस.अळगिरी यांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. आज हे अश्रू कामी आले असून द्रमुकने काँग्रेसला 20 ऐवजी 25 जागा देण्याचे मान्य केले आहे. भाजपला अण्णा द्रमुकने केवळ 20 जागा दिल्या आहेत. 

द्रमुकने काँग्रेसला अतिशय कमी जागांचा प्रस्ताव दिला आहे. जेमतेम 20 जागा देण्यावरच द्रमुक सहमत असल्याचे बोलले जात होते. यावर काल काँग्रेसची अंतर्गत बैठक झाली. या बैठकीत बोलताना के.एस.अळगिरी भावनिक झाले आणि त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. द्रमुकने काँग्रेसला अतिशय कमी जागा दिल्या असून, हा प्रस्ताव स्वीकारल्यास राज्यातून काँग्रेस नाहीशी होईल. यामुळे पक्षाने द्रमुकशी जागा वाटप करण्यासाठी माझ्याऐवजी दुसरा नेता नेमावा, असेही अळगिरी यांनी बैठकीत पक्षाला बजावले.  

अळगिरींच्या भावनिक बोलण्यानंतर बैठकीत काँग्रेस नेत्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची मागणी एकमुखाने केली. जागा वाटपावरुन दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये कटुता निर्माण झाली होती. पण ही नाराजी फार काळ टिकली नाही. काँग्रेस नेत्यांच्या नाराजीनाट्यानंतर द्रमुकने 25 जागा देण्यास मान्यता दिली आहे. 

मागील निवडणुकीत काँग्रेसला 41 जागा मिळाल्या होत्या. पण केवळ 7 उमेदवार निवडूण आले. द्रमुकला सत्तेपासून दूर ठेवण्यात हेही कारण असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे काँग्रेसला जास्त जागा देण्यास द्रमुख उत्सुक नव्हते. त्यामुळे काँग्रेसमध्येही नाराजी होती. अखेर आज आज अंतिम जागावाटपावर शिक्कामोर्तब झाले आहे. 

राज्यात सत्तेत असलेल्या अण्णा द्रमुकने यावेळी भाजपशी आघाडी केली आहे. मागील निवडणुकीत भाजप स्वतंत्रपणे लढले होते. पण एकही आमदार निवडूण आला नाही. अण्णा द्रमुकशी आघाडी केल्यानंतर जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी भाजपने प्रयत्न केले. मात्र, केवळ 20 जागा आणि एक लोकसभेची जागा मिळविण्यात भाजपला यश आले. काँग्रेस भाजपपेक्षा पाच जागा जास्त मिळाल्या आहेत. 

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com