भाजपकडून Congress Toolkit उघडकीस..संबित पात्रा म्हणतात, "मोदींना बदनाम करण्याचा डाव.." 

भाजप प्रवक्ते संबित पात्रा Sambit Patra यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत.
4Sarkarnama_20Banner_20_285_29_13.jpg
4Sarkarnama_20Banner_20_285_29_13.jpg

नवी दिल्ली : देश कोरोना संकटाचा सामना करीत असताना राजकीय पक्ष कोरोना संकटाचा फायदा कसा होईल, यात व्यग्र आहेत. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात यावरुन शाब्दिक युद्ध रंगले आहे. भाजप प्रवक्ते संबित पात्रा Sambit Patra यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. congress vs bjp on toolkit sambit patra covid rajeev gauda fir case reactions

कोरोना संकटात कॉंग्रेस टूलकिटद्वारे जनमानसात गैरसमज पसरवण्याचे काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याचा कॅाग्रेसचा डाव आहे, असा आरोप पात्रा यांनी केला आहे. कोरोना काळात सामान्य जनता संकटात असताना भाजप- कॅाग्रेस एकमेंकावर हल्लाबोल करीत आहे.  

संबित पात्रा यांनी आज पत्रकार परिषदेत कॅाग्रेसच्या टुलकिटबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, कोरोना महामारीमध्ये कॅाग्रेस देशाला आणि नरेंद्र मोदींना बदनाम करीत आहेत. कॅाग्रेसचे नेते भारतीय विषाणूला " मोदी विषाणू"  म्हणतात, कुंभमेळ्याला " सुपर स्प्रेडर"  म्हणून सांगतात, अन्य विचारवंतानाही कॅाग्रेस अशाच प्रकारचे विधानं करण्यासाठी सांगत आहेत. 

राहुल गांधी रोज सकाळी टि्वट् करतात, हा पण या टुलकिटचाच एक भाग आहे.  राहुल गांधी टि्वट करुन देशाला बदनाम करीत आहेत. त्यांनी कुंभमेळ्याच्या वेळी टि्वट केलं होतं, पण ईदच्या वेळी मैान धारण केलं, अस पात्रा म्हणाले. 

कॉंग्रेसने एक टूलकिट तयार केली असून या संकटाचा राजकारणासाठी कसा फायदा घ्यायचा हे यात नमूद करण्यात आले आहे. ही टूलकिटचा भंडाफोड काँग्रेसमधीलच एकाने केला आहे. कॅाग्रेस नेता राजीव गैाडा यांनी सांगितले की, बीजेपी कोरोनाच्या उपाययोजनांमध्ये अपयशी झाल्यामुळे कॅाग्रेसवर टूलकिटचा आरोप लावत आहे.  याप्रकरणी आम्ही भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि संबित पात्रा यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करणार आहेत. 

पात्राच्या म्हणण्यानुसार कॅाग्रेसच्या टूलकिटमध्ये असे म्हटले आहे...

  1. काही प्रकाशनांमध्ये मिसिंग मॅनेजमेंट आणि मिसिंग गव्हर्नमेंट छापा. 
  2. वारंवार पत्र लिहायला लावा.  
  3. सोनिया गांधी,  राहुल गांधी,अन्य व्यक्तींकडून पत्र लिहून घ्या. 
  4. पत्र मधूनमधून लिहित राहायचे आहे.
  5. कशा प्रकारे हे पत्र लिहावे हे टूलकिटमध्ये सांगितले आहे.
  6. पीएम केअर्स फंडवरूनही विविध प्रश्न विचारा

Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com