दोन आमदारांच्या मुलांना सरकारी नोकरी; मुख्यमंत्री अन् काँग्रेस प्रदेशाध्यक्षांमध्ये ठिणगी

काँग्रेसमधील अनेकांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.
Congress State president attacks on CM over job to Two MLAs Son
Congress State president attacks on CM over job to Two MLAs Son

चंदीगड : पंजाबचे (Punjab) मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Capt Amrinder singh) आणि माजी मंत्री नवजोत सिंग सिद्धू (Navjyot Singh Siddhu) यांच्यात जोरदार वाद सुरू आहे. आता मुख्यमंत्र्यांविरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्षही मैदानात उतरल्याने अडचणी वाढू लागल्या आहेत. दोन आमदारांच्या मुलांना सरकारी नोकरी दिल्यामुळं हा वाद निर्माण झाला असून पंजाब काँग्रेसमधील कलह वाढत चालल्याचे बोलले जात आहे. (Congress State president attacks on CM over job to Two MLAs Son)

पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभेची (Assembly Election) निवडणूक होणार आहे. पण त्याआधीच काँग्रेसमधील अनेकांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. नवजोत सिंग सिद्धू आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सातत्याने जोरदार खडागंजी होत आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने काँग्रेसमध्ये उघडपणे दोन गट पडल्याचे दिसते. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार नसल्याची भूमिका सिद्धू यांनी घेतली आहे. आता प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनीही मुख्मयंत्र्यांविरोधात मोर्चा उघडला आहे.

पोलिस निरीक्षक अन् नायब तहसीलदारपदी नियुक्ती

पंजाब सरकारने शुक्रवारी काँग्रेसचे आमदार अर्जुन प्रताप सिंह बाजवा आणि भीष्म पांडे यांच्या मुलांची अनुक्रमे पोलिस निरीक्षक व नायब तहसीलदार पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या दोघांच्या आजोबांची दहशतवाद्यांनी हत्या केल्यामुळं सरकारने त्यांच्या कुटूंबियांप्रति सद्भावना व्यक्त करण्यासाठी दोघांना नोकरी दिली आहे. यावरून जाखड यांनी हा निर्णय रद्द कऱण्याची मागणी केली आहे.

मुख्यमंत्र्यांना हा चुकीचा निर्णय रद्द करावा लागेल. हा निर्णय काँग्रेस पक्षाच्या संस्कृतीला अशोभनीय आहे, असे जाखड म्हणाले. तर काँग्रेस आमदार कुलजीत नागरा व अमरिंदर सिंह राजा वारिंग यांनीही या निर्णयाला विरोध केला आहे. तसेच आमदारांच्या दोन मुलांना नोकरी स्वीकरू नये, असे आवाहनही वारिंग यांनी केलं आहे. शिरोमणी अकाली दलाने मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली आहे. 

मुख्यमंत्र्यांनी मात्र या निर्णय़ाचे समर्थन केले आहे. हा निर्णय बदलण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांच्या कुटूंबियांनी दिलेल्या बलिदानाबद्दल त्यांचा हा छोटासा सन्मान आहे. काही लोकांकडून याला राजकीय रंग दिला जात आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. पंजाबमध्ये हा निर्णय सध्या वादग्रस्त ठरल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पुढील वर्षी निवडणुका होणार असल्याने सरकारकडून आमदारांना प्रलोभने दाखविली जात असल्याचा आरोप अकाली दलाने केला आहे. तसेच काँग्रेस पक्षातील अंतर्गत वादही समोर येवू लागल्याने मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com