काँग्रेसनं दिग्विजय सिंह यांच्याकडं दिली मोठी जबाबदारी
Congress sets up panel to plan agitations on national issues

काँग्रेसनं दिग्विजय सिंह यांच्याकडं दिली मोठी जबाबदारी

काँग्रेसनं नऊ सदस्यांची एक समितीची जाहीर केली आहे.

नवी दिल्ली : मागील काही महिन्यांपासून देशभरात इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यांसह मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात काँग्रेसकडून देशभरात आंदोलन केलं जाणार आहे. पुढील काही महिन्यांत देशातील अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. यापार्श्वभूमीवर सरकारला कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेसनं रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. (Congress sets up panel to plan agitations on national issues)

काँग्रेसकडून देशभरात 20 ते 30 सप्टेंबर या कालावधीत देशभरात आंदोलन केलं जाणार आहे. इतर विरोधी पक्षांचाही या आंदोलनात सहभाग असण्याची शक्यता आहे. त्यासाठी काँग्रेसनं नऊ सदस्यांची एक समितीची जाहीर केली आहे. पक्षाचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी या समितीची घोषणा केली आहे. राज्यसभेचे खासदार व ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह (Digvijay Singh) या समितीचे अध्यक्ष असतील.

पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनाही या समितीत स्थान देण्यात देण्यात आलं आहे. तसेच राहुल गांधी यांच्या टीममधील मनिष छतरथ, माजी खासदार उदित राज, खासदार उत्तम रेड्डी, रिपूण बोरा, बी. के. हरिप्रसाद, रागिणी नायक आणि झुबेर खान यांचाही या समितीत समावेश करण्यात आला आहे. ही समिती आंदोलनाचे नियोजन करणार आहे. 

दरम्यान, मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी जोरदार टीका केली. त्यांनी थेट GDP चं नामांतर केलं. काही महिन्यांपासून सातत्यानं इंधनाचे दर वाढत आहेत. तर केंद्र सरकारनं देशाचा GDP वाढल्याचा दावा केला आहे. राहुल गांधी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. देशाचा GDP वाढल्याचा दावा सरकारकडून करण्यात आल्यानंतर त्याचा संदर्भ राहुल यांनी थेट त्याचं नामांतर केलं. गॅस, डिझेल, पेट्रोल (GDP) असं नाव राहुल यांनी दिलं आहे. प्रत्यक्षात GDP म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पादन (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट). कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती मोजण्याचे हे एक मापक आहे. देशानं त्यावर्षी देशांतर्गत उत्पादन केलेल्या वस्तू आणि सेवांची एकत्रित किंमत म्हणजे त्या देशाचा GDP होय. 

देशातील वाढत्या इंधन दरावरून राहुल म्हणाले, देशाचा GDP म्हणजे गॅस, डिझेल, पेट्रोलचे दर सतत वाढत आहेत. यातून केंद्र सरकारनं 23 लाख कोटी रुपये कमावले आहेत. हा पैसा कुठे गेला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मागील सात वर्षात आपण एक मोठा आर्थिक बदल पाहिला आहे. डिमोनेटायजेशन ते मोनेटायजेशन हे दोन्ही एकत्र होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चार-पाच मित्रांचे मोनटायजेशन होत आहे. तर शेतकरी, मजूर, छोटे दुकानदार, नोकरदार, सरकारी कर्मचारी आणि प्रामाणिक उद्योगपतींचे डिमोनेटायजेशन होत आहे, अशी टीका राहुल यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in