'तुमची गाडी पेट्रोल-डिझेलवर चालत असेल पण मोदी सरकार कर वसुलीवर चालतं''  

राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.
34Sarkarnama_20Banner_20_202021_04_22T164950.481_0 - Copy.jpg
34Sarkarnama_20Banner_20_202021_04_22T164950.481_0 - Copy.jpg

मुंबई :  गेल्या काही दिवसापासून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडाला आहे. इंधनदरवाढीमुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या इंधनदरवाढीवरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मोदींवर नेहमीचं टीका करणारे राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. congress rahul gandhi slams modi government over fuel price hike

''तुमची गाडी पेट्रोल-डिझेलवर चालत असेल पण मोदी सरकार कर वसुलीवर चालतं,'' असे टि्वट राहुल गांधी यांनी केलं आहे. दिल्लीत आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किमंतीत वाढ झाली आहे. पेट्रोल १००.२१ रुपये, तर डिझेल ८९.५३ रुपये प्रति लिटर रुपयांवर पोहचले आहे. याबाबतचे वृत्त राहुल गांधी यांनी टि्वट करुन शेअर केले आहे. 

विधानसभा निवडणुकीनंतर इंधन दरवाढीवरुन राहुल गांधी यापूर्वी मोदींवर निशाणा साधला होता. ''निवडणुका संपल्या की पुन्हा लूट सुरू'' असं त्यांनी म्हटलं होतं. ''मोदी सरकारच्या विकासाची अशी परिस्थती आहे की, एखाद्या दिवशी इंधन दरवाढ झाली नाही तर ती मोठी बातमी होते,'' असं म्हणत राहुल गांधींनी मोदी सरकारला चिमटा काढला होता. 
दिलीप कुमार यांना पाहण्यासाठी मी सायकलवरुन जेजुरीला गेलो होतो.. 
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी दु:ख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टि्वट करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलीप कुमार यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. एक दिग्गज अभिनेता हरपला, असे पवार म्हणाले.

आंबिल ओढ्यावरील पालिकेची कारवाई योग्य होती का? राऊतांचे मुख्यमंत्र्यांना पत्र  
मुंबई : पुणे शहरातील आंबिल ओढा, दांडेकर पुल येथे मागासवर्गीयांची मोठया प्रमाणात झोपडपट्टी वसाहत आहे. ओढयाच्या रुंदीकरणाच्या नावाखाली या रहिवाशांची घरे पाडण्याच्या पुणे मनपाच्या बेकायदेशीर कृतीची स्वतंत्र चौकशी राज्य सरकारने करावी, अशी मागणी ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com