सुरतमधून काँग्रेस हद्दपार; महापालिका निवडणुकीत दारूण पराभव

गुजरातमधील सहाहीमहापालिकांतकाँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे.
Congress major defeat in gujrat municipal election
Congress major defeat in gujrat municipal election

अहमदाबाद : पंजाब मधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत काँग्रेसला मोठे यश मिळाले होते. पण काँग्रेसला हा आनंद फारकाळ साजरा करता आला नाही. गुजरातमधील सहा महापालिकांच्या निवडणुकांची मतमोजणी आज सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांवरून काँग्रेस सुरतमधून हद्दपार झाली आहे. तर इतर पाच महापालिकांतही काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. 

गुजरातमधील राज्यसभेच्या दोन जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. अहमद पटेल यांच्या निधनानंतर त्यांच्या जागेवरही काँग्रेसने उमेदवार दिला नाही. तसेच आता महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसला प्रभाव पाडता आला नाही, असे दिसते. गुजरातमधील सुरत या महत्वाच्या शहरांत काँग्रेसला अपेक्षित कामगिरी करता आला नाही. २०१५ च्या निवडणुकीत काँग्रेसचे ३६ उमेदवार निवडूण आले होते. यावेळी काँग्रेसला खातेही खोलता आले नाही. 

जवळपास हीच स्थिती अन्य पाच महापालिकांतही आहे. आतापर्यंत झालेल्या निकालांमध्ये भाजपने बहुमत मिळवले आहे. अहमदाबादमध्ये १४५ पैकी १२६ जागा भाजपला मिळाल्या आहेत. इथे काँग्रेस जमेतेम १४ पर्यंत पोहचली आहे. राजकोटमध्ये ७२ पैकी ६८ भाजपला तर काँग्रेसला केवळ चार, जामनगरमध्ये भाजपला ६४ पैकी ५० तर काँग्रेसला ११ जागा मिळाल्या आहेत.

भावनगरमध्ये ५२ पैकी ४४ जागांवर भाजप विजयी झाले आहे. इथे काँग्रेसला ८ जागांवरच समाधान मानावे लागले. तर वडोदरामध्येही भाजपने ६५ जागा मिळवत सत्ता मिळविली. काँग्रेसला ७२ पैकी केवळ सात जागा मिळाल्या आहेत. सहाही महापालिकांत भाजपचे एकुण ४४९ उमेदवार विजयी झाले असून काँग्रेसला केवळ ४४ जागा मिळाल्या. काँग्रेसला अद्याप ५० चा आकडाही पार करता न आल्याने नामुष्की ओढवली आहे. 

सहाही महापालिकेत भाजपने जोरदार मुसंडी मारल्याने पुन्हा एकदा भाजपची सत्ता येण्याची चिन्हे आहेत. यापूर्वीही सहाही महापालिका भाजपच्याच ताब्यात आहे. पंजाबमध्ये नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठा विजय झाला. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका झाल्याने पंजाबमधील निवडणुकांना महत्व होते. त्यापाठोपाठ गुजरातमध्येही निवडणुका झाल्या. पण शेतकरी आंदोलनाचा कोणताही परिणाम या निवडणुकांवर झाल्याचे दिसत नाही. 

Edited by Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com