भाजपच्या "आत्मनिर्भर टी स्टॉल"वर सावंतांचा निशाणा.. 

गेल्या सहा वर्षांमध्ये १२ कोटी रोजगार त्यांनी दिले पाहिजे होते. परंतु, त्या ऐवजी १२ कोटी रोजगर होते ते देखील नष्ट झालेले आहेत.
ss=nm6.png
ss=nm6.png

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेच्या संकल्पनेतून मुंबई भाजपा ओबीसी मोर्चातर्फे ‘आत्मनिर्भर टी’ स्टॉल योजनेचं उद्धघाटन आज विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे सचिन सावंत यांनी भाजपवर टीका केली आहे. याबाबत सचिन सावंत यांनी एक व्हिडिओ टि्वट केला आहे. 

आपल्या टि्वटमध्ये सचिन सावंत म्हणतात, ''मोदींजी च्या "आत्मनिर्भर पकौडा" प्रकल्पाच्या अपयशानंतर मोदींच्या संकल्पनेनुसार बेरोजगारांसाठी @bjp4mumbai सुरू करीत आहेत. ढॅण्टॅढॅण....."आत्मनिर्भर टी स्टॉल" असं म्हणत भाजपवर सावंतानी निशाणा साधला आहे. 

सचिन सावंत आपल्या व्हिडिओमध्ये म्हणतात, ''नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनांमधून, योजनांमधून तरूणांना रोजगार मिळालेला नाही. परंतू त्यांनी त्याच्याबरोबर अभूतपूर्व तंत्रज्ञानाचा अविष्कार देखील केलेला आहे. त्यातील एक महत्वपूर्ण तंत्रज्ञान होतं गटरगॅस तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञान चहा बनवायला नक्कीच गटरगॅसचाही उपयोग होईल, अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. ज्याचं प्रदर्शन या टी-स्टॉलमधून केलं जाईल व देवेंद्र फडणवीस स्वतः त्याचं उद्घाटन करतील, अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात. बेरोजगारीचा प्रश्न त्यांना सोडवता आलेला नाही, रोजगार तर देता आलेला नाही. परंतु, नवीन योजना ते नक्कीच देतात. त्यातीलच एक अतिदुरदृष्टीनं प्रेरीत झालेली, महत्वकांक्षेने भारीत झालेली योजना होती.''

''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येण्यापूर्वी दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजागार देण्याचं वचन दिलं होतं. गेल्या सहा वर्षांमध्ये १२ कोटी रोजगार त्यांनी दिले पाहिजे होते. परंतु, त्या ऐवजी १२ कोटी रोजगर होते ते देखील नष्ट झालेले आहेत. बेरोजगाराची एक प्रचंड फौज मोदींनी निर्माण केलेली आहे,'' असे सावंत यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com