भारतातील अनियंत्रित संसर्ग जगासाठीही घातक; देश लॅाकडाऊनच्या वाटेवर

भारतातील पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक तीव्र आहे.
Congress Leader Rahul Gandhi letter to PM Narendra Modi
Congress Leader Rahul Gandhi letter to PM Narendra Modi

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून देशामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना संसर्ग वाढला आहे. मागील तीन दिवसांपासून दररोज चार लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत. तर जवळपास चार हजार रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यातच कोरोनाचे नवनवे प्रकार समोर येत असल्याने संसर्ग अधिक वेगाने वाढत असल्याचा दावा काही शास्त्रज्ञांनी केली आहे. (Congress Leader Rahul Gandhi letter to PM Narendra Modi)

भारतातील पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक तीव्र आहे. ही लाट भारतासह जगासाठीही अधिक घातक असल्याची भीती काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ही भीती व्यक्त केली आहे. कोरोनाची दुसरी लाट रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याने देश पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावरील लॅाकडााऊनच्या दारात उभा आहे, अशी टीकाही त्यांनी पत्रात केली आहे.

आपला देश कोरोनाच्या त्सुनामीत अडकल्याने मी तुम्हाला पुन्हा एकदा पत्र लिहिण्यासाठी भाग पडले. या संकट काळात भारतातील लोकांना आपण प्राधान्य द्यायला हवे. लोकांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी जे करता येऊ शकते ते करा, अशी विनंती राहुल यांनी पत्रातून केली आहे. जगातील प्रत्येक सहा लोकांमागे एक भारतीय आहे. या महामारीमुळे हे स्पष्ट झाले आहे की, देशाचा आकार, अनवांशिकेतील विविधता आदींमुळे भारतात संसर्ग होण्यासाठी अनुकूल स्थिती आहे, असेही राहुल म्हणाले.

देशातील अनुकूल स्थितीमध्ये कोरोना विषाणू सतत आपले रुप बदलत अधिक घातक पध्दतीने आले आहेत. सध्या आपण ज्या डबल म्यूटंट आणि ट्रिपल म्यूटंट विषाणुला पाहत आहोत, ती सुरूवात असू शकते. या विषाणुचा अशाप्रकारे अनियंत्रित संसर्ग केवळ आपल्या देशातील लोकांसाठी घातक नाही तर जगासाठीही घातक ठरू शकतो, अशी भीती राहुल गांधी यांनी पत्रातून व्यक्त केली आहे. 

कोरोना विषाणू आणि त्याच्या विविध स्वरूपांचा शास्त्रीय अभ्यास करायला हवा. सर्व नवीन विषाणुंच्या प्रकारांवर लसीकरणाच्या प्रभावाबाबत अभ्यास होण्याची गरज आहे. सर्व लोकांना वेगाने लस द्यावी. तसेय या स्थितीत लॅाकडाऊनमुळे गरीबांना आर्थिक मदत व खाद्यान्न उपलब्ध करून द्यावे, जेणे करून त्यांना अडचणी निर्माण होणार नाहीत. या संकटकाळात देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व पक्ष व घटकांना विश्वासात घेऊन काम करावे, असे आवाहनही राहुल गांधी यांनी केले आहे.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com