प्रियंका गांधी म्हणाल्या, ''मोदींजी, ही वेळ 'तू-तू मैं-मैं' करण्याची नाही..मनमोहनसिंगांचा सल्ला माना..

नरेंद्र मोदी हे निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र आहेत.
Sarkarnama Banner (70).jpg
Sarkarnama Banner (70).jpg

नवी दिल्ली : देशभरात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असून  रेमडेसिवीरसह लसींचाही तुटवडा जाणवत आहे. देशात करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने अनेक राज्यांमधील स्थिती बिकट होत चालली आहे. ऑक्सिजन, रेमडेसिवीर, कोरोना लशींसाठी केंद्राकडे ओरड होत आहे, यावरुन कॅाग्रेसने भाजपवर निशाणा साधत टीका केली आहे. 

'एएनआय'शी बोलताना काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी म्हणाल्या की, केंद्र सरकारच्या उदासिनतेमुळे देशात कोरोनाचे फैलाव वेगाने होत आहे. कोरोनाला रोखणे हे महत्वाचे आहे. यावरून राजकारण करू नये. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना याबाबत जो सल्ला व सूचना दिल्या आहेत. त्याची मोदींनी अंमलबजावणी करावी.  देशात ऑक्सिजनचा साठा आहे, पण फक्त दोन हजार ट्रकने वाहतूक करून त्यांचे वितरण होत आहे. ज्या ठिकाणी ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज आहे, त्या ठिकाणी तो पोहचत नाही.  ही वेळ 'तूं-तूं मैं-मैं' करण्याची नाही,  कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी सर्व पक्ष केंद्र सरकारच्या सोबत आहे. पण मोदी हे निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र आहेत. त्यांना विरोधी पक्षासोबत बोलण्यास वेळ नाही.

प्रियंका गांधी म्हणाल्या, ''अँटीजेन चाचण्या कशासाठी?  संख्या कमी करण्यासाठी? आजही असे अहवाल येत आहेत की खासगी लॅबकडून चाचणी थांबविण्याचे सांगितले जात आहे. तुमच्यासाठी काय महत्वाचे आहे लोकांचे जीवन, सरकारी आकडेवारी कि  सरकारची प्रतिमा ?  ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सरकारच्या पाहणीत आढळले होते की, त्यांच्या 5 कोटी लोक कोरोना  विषाणूच्या संपर्कात आले. चाचणी घेण्याची शिफारस केली जात होती. उत्तर प्रदेश सरकारने 70 टक्के अँटीजन चाचण्या सुरू केल्या, म्हणजे  उत्तर प्रदेश मध्ये केवळ 30 टक्के आरटी-पीसीआर चाचणी घेतली जात आहे 

"हे सरकार दुबईतील 'आयएसआय'शी बोलू शकते. ते विरोधी नेत्यांशी बोलू शकत नाहीत का? मनमोहन सिंगजी दहा वर्षासाठी पंतप्रधान होते. प्रत्येकाला माहित आहे की एखाद्या व्यक्तीचा ते  किती सन्मान करतात. जर देश महामारीचा सामना करत असेल ,तर  मनमोहनसिंग यांनी जो सल्ला दिला. त्यांच्या सूचना सरकारने  सन्मानाने स्विकारायाला हव्यात. पंतप्रधानांची रॅलीच्या  मंचावरून उतरावे आणि  सांगावे कि लोकांचा जीव  कसा वाचवणार, असा सवाल गांधी यांनी उपस्थित केला आहे. 

गेल्या १ महिन्यांत १.१ दशलक्ष रेमडेसिवर  इंजेक्शन निर्यात करण्यात आले. आज देशात कमतरता आहे. सरकारने 6 कोटी लस निर्यात केली. जानेवारी-मार्चमध्ये लसीकरण करण्यात आले. सरकारने जानेवारी ते मार्च या महिन्यात  3 कोटी भारतीयांना लस दिली. तुम्ही भारतीयांना प्राधान्य का दिले नाही, असे प्रियंका गांधी म्हणाल्या. 
  
माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते मनमोहनसिंग ( manmohan singh ) यांनी पंतप्रधान मोदींना ( pm modi ) पत्र लिहिलं आहे. करोनावरील लसीकरण मोहीमेला वेग देण्याची गरज आहे. विदेशी कंपन्यांकडून लस मागवण्यासाठी अॅव्हान्समध्ये ऑर्डर दिली पाहिजे, असं मनमोहनसिंग यांनी पत्रात म्हटलं आहे.
Edited by: Mangesh Mahale
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com