मोदींनी दररोज आपला वाढदिवस साजरा करावा ; चिदंबरम यांचा टोमणा

पी. चिदंबरम यांनी मोदींवर खोचक टीका केली आहे. याबाबत त्यांनी टि्वट केलं आहे.
Sarkarnama - 2021-09-18T124634.249.jpg
Sarkarnama - 2021-09-18T124634.249.jpg

नवी दिल्ली:  पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) ७१ वा वाढदिवस काल साजरा करण्यात आला. यानिमित्ताने नवा व्रिकम करण्यात आला, काल एका दिवसात अडीशेकोटी ( २.५ कोटी) नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली. या लसीकरणावरुन आता राजकारण पेटलं आहे. कालच्या लसीकरणावरुन कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम  (p. Chidambaram) यांनी मोदींवर खोचक टीका केली आहे.  याबाबत त्यांनी टि्वट केलं आहे. 

आपल्या टि्वटमध्ये चिदंबरम म्हणतात की ''अडीच कोटी  लोकांचे लसीकरण  (Vaccination) एका दिवसात करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसाची वाट का पाहावी लागली? भाजपशासित राज्ये ज्यात यूपी, एमपी, गुजरात ही पंतप्रधानांच्या वाढदिवसाला  अधिक लसीकरण करतात आणि  इतर दिवशी, लसीकरच्या बाबतीत ते "नॉन-परफॉर्मिंग" राज्य आहेत.''
 
CID : परमबीर सिंह नक्की आहेत तरी कुठे?
''माझी इच्छा आहे की, पंतप्रधानांनी त्यांचा वाढदिवस दररोज साजरा करावा. पंतप्रधानांचा वाढदिवस 31 डिसेंबर रोजी असता, तर 2.5 कोटी लसीकरण केवळ वर्षाच्या शेवटच्या दिवशी केले गेले असते का? लसीकरण म्हणजे वाढदिवसाला केक कापण्यासारखे नाही. लसीकरण हा एक कार्यक्रम आहे, ती एक प्रक्रिया आहे. वाढदिवसाच्या दिवशी शिखर गाठण्याऐवजी त्याला दररोज गती द्यावी लागते.'' असा टोला चिदंबरम यांनी मोदींना लगावला आहे.

मोठी कारवाई ; ATSने एकाला ताब्यात घेतलं,  जान मोहम्मदचा हँडलर असण्याची शक्यता
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी काल मोदींच्या वाढदिवसानिमित्त आनंद व्यक्त केला.  ते म्हणाले की, लससेवा करताना आरोग्य कर्मचारी आणि देशवासियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अनोखे गिफ्ट दिले आहे. मोदींच्या वाढदिवशी भारताने नवा विक्रम स्थापित केला आहे. एकाच दिवसात 2 कोटी डोस देण्याचा ऐतिहासिक आकडा आपण पार केला आहे. वेल डन इंडिया!  

धक्कादायक : माहेरच्या मंडळींनी सासरच्या दारात केले तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार 
काल आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दिवसभरात 34,403 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 320 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 37, 950 बाधित उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com