नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी नवी दिल्लीत निधन झाले. पटेल यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली
पटेल हे काँग्रेसचे भक्कम आधारस्तंभ होते. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे ते राजकीय सचीव होते. १ नोव्हेंबरला त्यांना कोरोनाची लागण झाली होती. गुरुग्राममधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. पटेल यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे राजकीय सचीव म्हणूनही काम पाहिले होते. ते तीन वेळा लोकसभेत तर पाच वेळा राज्यसभेत निवडून आले होते. काँग्रेसचे निष्ठावान अशी त्यांची ओळख होती.
फैजल यांचे पूत्र फैजल यांनी पहाटे ट्वीट करुन पटेल यांच्या निधनाची माहिती दिली आहे. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी कुणीही गर्दी करु नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.

