दारात मरण उभं आहे... संसदेचं विशेष अधिवेशन घ्या...कॅाग्रेसचे राष्ट्रपती, लोकसभेच्या अध्यक्षांना पत्र

कॅाग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहिलं आहे.
Sarkarnama Banner - 2021-05-11T095136.108.jpg
Sarkarnama Banner - 2021-05-11T095136.108.jpg

नवी दिल्ली :  देशातील अनेक राज्यात कोविडची परिस्थिती खराब होत चालली आहे. आँक्सिजन, बेडची कमतरता निर्माण झाली आहे. कॅाग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी याबाबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद व लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला  यांना पत्र लिहिलं आहे.

याबाबत संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी त्यांनी राष्ट्रपतींना केली आहे.नवीन धोरणे आणि निती ठरवताना संसदेच्या सदनामध्ये झालेल्या चर्चेमधील मुद्दे सरकारला नक्कीच उपयुक्त ठरतील, असे त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.

कोरोनाच्या परिस्थितीबाबत द लॅन्सेटने नुकताच आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे. यात भारतामध्ये १ ऑगस्टपर्यंत १० लाख लोकांचा करोनामुळे मृत्यू होईल,असे  द लॅन्सेटच्या अहवालात म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष आणि राष्ट्रपतींना पत्र लिहिलं आहे.

अधीर रंजन चैाधरी आपल्या पत्रात म्हणतात की, कोविडला रोखण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन लवकर बोलवावे. कारण देशातील खासदार आपल्या राज्यातील परिस्थिती केंद्राला सांगतील. त्यामुळे यातून काही उपाययोजना करता येईल.

"कोविडमुळे देशात संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे. आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडला आहे.  दररोज रुग्णसंख्या चार लाखांच्या जवळपास पोहचत आहे. दुसऱ्या लाटेमुळे देशभरामध्ये भिती, नैराश्य, उदासिनता आणि असहाय्यपणाची भावना जनतेमध्ये निर्माण झाली आहे. प्रत्येक कुटुंबाच्या दारात मरण उभं आहे, अशी भिती निर्माण झाली आहे," असे अधीर रंजन यांनी पत्रात नमूद केले आहे.  

"कोरोनाच्या  या धोकादायक साथीच्या रोगासंदर्भात नवीन धोरणे आणि निती ठरवताना संसदेच्या सदनामध्ये झालेल्या चर्चेमधील मुद्दे सरकारला नक्कीच उपयुक्त ठरतील," असंही अधीर रंजन यांनी म्हटलं आहे. देशाला सावरण्यासाठी संसदेत चर्चा होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com