मतमोजणीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा..!

मध्य प्रदेशात मिनी विधानसभा ठरणार पोटनिवडणुका झाल्या आहेत. या पोटनिवडणुकांत भाजपने काँग्रेसवर आघाडी घेतल्याचा कल दिसत आहे.
congerss workers create ruckus in indore polling station
congerss workers create ruckus in indore polling station

भोपाळ : मध्य प्रदेशातील मिनी विधानसभा ठरलेल्या 28 मतदारंसघातील पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर होत असून, भाजपने आघाडी घेतली आहे. भाजप 19 जागांवर पुढे असून, काँग्रेस 8 तर बहुजन समाज पक्ष एका जागेवर पुढे  आहे. मतमोजणीवेळी इंदोरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी मतमोजणी थांबवण्याची मागणी करीत गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे. 

मध्य प्रदेशात 28 विधानसभा मतदारसंघात 3 नोव्हेंबरला पोटनिवडणुका झाल्या. या पोटनिवडणुकांची मतमोजणी आज सुरू आहे. जोतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत 25 आमदार काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते. त्यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडले होते. आता हे सर्व आमदार भाजपच्या तिकिटावर उभे असून, तीन मतदारसंघात विद्यमान आमदारांचे निधन झाल्याने पोटनिवडणुका झाल्या. 

एक्झिट पोलनुसार, भाजपला 28 पैकी 17 जागा मिळतील. काँग्रेसला 11 जागा मिळतील, असा अंदाज होता. याचा फटका जोतिरादित्य शिंदे यांचा समर्थक आमदारांना बसेल, अशी शक्यता होती. कमलनाथ हे जोतिरादित्य शिंदे यांना धक्का देण्यात यशस्वी ठरतात का याचीही उत्सुकता होती. याचबरोबर ते  शिवराजसिंहाच्या खुर्चीला धक्का देतात का याकडेही लक्ष लागले होते. 

पोटनिवडणुकांतील मजमोजणीचा प्राथमिक कल पाहता भाजपने आघाडी घेतली आहे. भाजप 19, काँग्रेस 8 आणि बहुजन समाज पक्ष एका जागेवर आघाडीवर आहे.  इंदोरमध्ये मतमोजणी केंद्रावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काँग्रेसचे उमेदवार प्रेमचंद गुड्डून यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत मतमोजणीवर बहिष्कार घालण्याची धमकी दिली. निवडणूक अधिकाऱ्यांचे चुकीचे नियोजन केले असून, गैरप्रकार केल्याचा आरोप त्यांनी केला. 

याबद्दल बोलताना प्रेमचंद गुड्डू यांचे पुत्र व पक्षाचे नेते अजित बोरासी म्हणाले की, ईव्हीएमचे सील निघालेले होते. निवडणूक अधिकारी भाजपच्या दबावाखाली काम करीत आहेत. आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत. 

राज्यातील सत्ता कायम राखण्यासाठी भाजपला केवळ 8 जागा हव्या आहेत. काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी पोटनिवडणुकीतील सगळ्या जागा जिंकाव्या लागतील. यानंतर राजकीय समीकरणे बदलू शकतात. कमलनाथ यांच्यावर आता मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. कारण काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या 22 आमदारांना पराभूत करुन सत्त्तांतराचा वचपा त्यांना काढावा लागणार आहे. विधानसभेचे एकूण संख्याबळ 230 आहे. भाजपचे 107 आमदार असून, काँग्रेसचे 87, अपक्ष 4, बहुजन समाज पक्षाचे 2 आणि समाजवादी पक्षाचा 1 आमदार आहे.  

या पोटनिवडणुकांमुळे मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण तापले होते. काँग्रेसचे सरकार पाडणाऱ्या भाजपला धडा शिकवण्यासाठी काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी कंबर कसली होती. राज्यातील भाजप नेत्यांना फोडून मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्नही कमलनाथ यांनी या निवडणुकीत केला होता.  

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com