कमाल दाखविणार का कमल हासन..अन्नाद्रमुक-भाजप बाजी मारणार  - coimbatore south seat aiadmk bjp vanathi srinivasan mnm kamal haasan winning candidate | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

कमाल दाखविणार का कमल हासन..अन्नाद्रमुक-भाजप बाजी मारणार 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 2 मे 2021

. सध्या डीएमके ३५ जागांवर आघाडीवर आहे.

चेन्नई :  तमिळनाडूच्या ही निवडणुक महत्वाची ठरणार आहे कारण दिग्गज नेते जयललिता आणि एम. करुणानिधी यांच्याशिवाय पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या. या दोघांच्या अनुपस्थितीत राज्यात निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. अभिनेता कमल हासन यांचा मक्कल निधी मय्यम हा पक्ष ४३ जागा लढवत आहे.  रजनीकांत यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे निवडणूक आणि राजकारणातून अंग बाजूला काढून घेतले. त्यामुळे कमल हासन यांनी स्वतःच्या बळावर निवडणूक लढवली आहे. कमल हासन, भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष वनाथी श्रीनिवासन आणि काँग्रेसचे मयुर जयकुमार यांच्यात तुल्यबळ लढत झाली. सध्या डीएमके ३५ जागांवर आघाडीवर आहे.
 

लोकसभेत पराभव झाल्यानंतर आता कमल हासन यांनी विधानसभा निवडणूक लढवली आहे. कमल हासन दक्षिण कोयंबतूर या मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे.  पक्षाचे सरचिटणीस आणि माजी आयएएस अधिकारी डॉ. संतोष बाबू यांनी वेलाचेरी मतदारसंघातून निवडणूक लढवली. या दोन जागा पक्षासाठी महत्वाच्या आणि हक्काच्या मानल्या जात आहे. तामिळनाडूच्या आयटी विभागाचे डॉ. संतोष बाबू हे माजी सचिव होते. या दोघांशिवाय व्ही पोनराज यांना मक्कल निधी मय्यम पक्षाने उमेदवारी दिली आहे.  ते दिवंगत राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे सल्लागार होते.

कमल हासन यांनी 21फेब्रुवारी 2018 मध्ये मदुराई येथे मक्कल निधी मय्यम हा पक्ष स्थापन केला. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्याने तमिळनाडूत 39 आणि पुडुचेरीतून 1 असे 40 उमेदवार लोकसभेला उभे केले. परंतु सर्व उमेदवार पराभूत झाले.

विधानसभा निवडणुकीपूर्वी कमल हासन यांनी रजनीकांत यांना घेऊन एकत्र निवडणूक लढविण्याची योजना आखली. पण रजनीकांत यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे निवडणूक आणि राजकारणातून बाहेर पडले आहे.

तमिळनाडूत सत्ताधारी अण्णाद्रमुक आणि भाजपची आघाडी आहे. या विरोधात द्रमुक आणि काँग्रेसची आघाडी आहे. माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला यांनी राजकारणासह सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेतली आहे. त्यांचे पुतणे आमदार टी.टी.व्ही. दिनकरन यांनी मात्र, मागे न हटता निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. आता त्यांना एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांची साथ मिळाली आहे. त्यांच्या या आघाडीचा सर्वाधिक फटका सत्ताधारी अण्णाद्रमुकला बसण्याची चिन्हे आहेत. द्रमुकचे प्रमुख एम.के.स्टॅलिन यांच्या नावाला मुख्यमंत्रिपदासाठी पसंती मिळण्याची चिन्हे आहेत.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख