उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कोरोना पाॅझिटिव्ह

उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कोरोना पाॅझिटिव्ह आले आहेत. आपण स्वतः होम क्वारंटाईन असल्याची माहिती स्वतः योगी आदित्यनाथ यांनीच ट्वीट करुन दिली आहे.
Yogi Adityanath
Yogi Adityanath

लखनौ : उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ Yogi Adityanath कोरोना पाॅझिटिव्ह आले आहेत. आपण स्वतः होम क्वारंटाईन असल्याची माहिती स्वतः योगी आदित्यनाथ यांनीच ट्वीट Tweet करुन दिली आहे. आपल्या कार्यालयातील काही अधिकारी कोरोना Corona पाॅझिटिव्ह आल्याने आपण स्वतःला क्वारंटाईन करुन घेतले होते असे काल त्यांनी सांगितले होते. आज ते स्वतःच पाॅझिटिव्ह आले आहेत. UP Cm Yogi Adityanath Found Corona Positive

कालच  योगी आदित्यनाथ यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा Amit Shah यांच्यासमवेत पश्चिम बंगाल निवडणुकीच्या Wesh Bengal Elections पाचव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी रोड शो केला होता. दरम्यान, राज्याचा कारभार नेहमीप्रमाणेच मी पहात असून माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असेही योगी आदित्यनाथ यांनी आवाहन केले आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशात रेमडिसिवीरचा Remdisivir तुटवडा पाहता गुजरातहून तातडीने २५ हजार इंजेक्शने मागवून घ्यावीत, असा आदेश योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे. 

एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री कोरोना पाॅझिटिव्ह असताना दुसऱ्या बाजूला याच राज्यात कुंभमेळा Kumbh Mela होत आहे. त्याला लाखो भाविक आले आहेत. कोरोना नियमांचे सरसकट उल्लंघन त्यात होत आहे. मात्र,  देशामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दररोज दीड लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. आरोग्य व्यवस्था अनेक ठिकाणी कोलमडली असल्याचे पाह्याला मिळत आहे. सरकारकडून कठोर निर्बंध लागू केले जात आहेत. नागरिकांना गर्दी करण्यास मज्जाव करण्यात येत आहे. UP Cm Yogi Adityanath Found Corona Positive

अशा परिस्थितीत यात्रा, राजकीय मेळाव्यांसह धार्मीक ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे. हरिद्वार Haridwar येथे कुंभमेळ्यात झालेल्या गर्दीची सर्वत्रच जोरदार चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोणताही धर्म असो त्यातील आस्थेपेक्षा माणूस महत्वाचा, असल्याचे म्हटले आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com