कोलकता : पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप व तृणमूल काँग्रेसकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना त्यांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावरून लक्ष्य केले जात आहे. त्याचाच आधार घेत ममतांनी अमित शहांना खुले आव्हान दिले आहे.
भाजपकडून अभिषेक यांचे नाव घेत ममता बॅनर्जी यांच्यावर सतत टीका केली जाते. त्यावर पलटवार करत एका सभेमध्ये बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, ''अभिषेक यांना कधीच कुठेही विशेष अधिकार दिले नाहीत. तो राजकारणात नवीन आहे. त्यांना एका घटनेत त्याला मारण्याचाही प्रयत्न केला. मला वाईट वाटते की, माझ्यामुळे त्याला शिव्या खाव्या लागतात. मी त्याला राज्यसभेत जाण्याचा प्रस्ताव दिला होता. पण त्याने निवडणूक लढवून राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. अमित शहांनी त्यांच्या मुलाला राजकारणात आणून दाखवावे.''
हर दिन आप (अमित शाह) 'भाईपो' (भतीजे) कह रहे हैं। आपका बेटा भी मेरा भतीजा है। इसलिए अगर आपको दीदी और भतीजा कहना है, तो मैं अमित शाह को चुनौती देता हूं कि पहले अभिषेक बनर्जी और फिर मेरे खिलाफ चुनाव लड़ें: पश्चिम बंगाल CM ममता बनर्जी pic.twitter.com/JsLvXeCnXm
— ANI_HindiNews (@AHindinews) February 18, 2021
''प्रत्येक दिवशी तुम्ही भाच्याचे नाव घेत आहात. तुमचा मुलगाही माझा भाचा आहे. त्यामुळे जर तुम्हाला दीदी आणि भाचा म्हणायचे असेल तर, मी अमित शहांना आव्हान देते की, आधी अभिषेकविरोधात निवडणूक लढवून दाखवा. नंतर माझ्याशी लढा,'' असे खुले आव्हान ममतांनी अमित शहांना दिले.
हेही वाचा : सरकारविरोधात षडयंत्र : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, लष्करी अधिकाऱ्याला अटक...
अमित शहा यांच्यावर टीका करताना ममता म्हणाल्या, ''चार करणारेच जास्त ओरडत असतात. मी कधीही एवढे खोटे बोलणारे गृहमंत्री पाहिले नाहीत. शेतकऱ्यांचा अपमान केल्यानंतर ते पंजाबमध्ये संपून गेले. उत्तर प्रदेशातही त्यांची हार होईल. आसाममध्ये काही पर्याय नाही, म्हणून ते सत्तेत आहेत.''
उन्नावमध्ये दोन मुलींचा संयशी मृत्यू झाला. पण त्यावर गृहमंत्री एक शब्दही बोलले नाहीत. माझ्याशी लढणे एवढे सोपे नाही. मला हरवून राजकारण करायचे असले तर तुम्हाला हजार जन्म घ्यावे लागतील, अशी टीका ममतांनी केली.
Edited By Rajanand More

